ETV Bharat / bharat

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून दोन परप्रांतीय नागरिकांची हत्या

author img

By

Published : Oct 16, 2021, 8:13 PM IST

Updated : Oct 16, 2021, 9:04 PM IST

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अरविंद कुमार हे बिहारचे रहिवाशी होती. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ईदगाह पार्कजवळ गोळीबार केला. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडले. जखमी नागरिकाला श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे मृत घोषित करण्यात आले.

Non local vendor shot dead
Non local vendor shot dead

श्रीनगर - दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी श्रीनगरमधील ईदगाह भागात पाणीपुरीवाल्याची हत्या केली. अरविंद कुमार असे हत्या झालेल्या नागरिकाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशमधील सुताराची हत्या करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अरविंद कुमार हे बिहारचे रहिवाशी होती. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ईदगाह पार्कजवळ गोळीबार केला. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडले. जखमी नागरिकाला श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-आंध्र प्रदेशमधील बन्नी महोत्सवात काठ्यांची तुंबळ लढाई; 100 हून अधिक भाविक जखमी

दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशच्या कारागिराचा मृत्यू

अज्ञात हल्लेखोरांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सुताराची हत्या केली आहे. हा सुतार उत्तर प्रदेशमधील रहिवाशी होता. तो पुलवामा जिल्ह्यातील लिट्टर भागामधील दुकानात काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजीर हे लिट्टरमधील मिलमध्ये सुतार म्हणून काम करत होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अरविंद कुमार साह यांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.

5 ऑक्टोबरला दोघांसह बिहारमधील फेरीवाल्याची दहशतवाद्यांनी केली होती हत्या

5 ऑक्टोबरला रात्री लालबझार भागातील मदिना चौकात फेरीवाल्याची (पाणीपुरी विक्रेता) हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार रात्री ८ वाजता संशयित दहशतवाद्यांनी फेरीवाल्यावर हल्ला केला. यावेळी जागेवरच फेरीवाल्याचा मृत्यू जाला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे. मृत फेरीवाल्याची ओळख पटली आहे. विरेंदर पासवान असे या फेरीवाल्याचे नाव आहे. तो बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पासवान हे श्रीनगरमधील अलमगिरी बाजार येथे राहत होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने विशेष मोहिम सुरू केली आहे. याच दिवशी इक्बाल पार्कमधील बिंदू मेडिकेअर या प्रसिद्ध मेडिकलचे मालक पंडित मखन लाल बिंदू यांची हत्या केली. हाजीनमध्ये एका नागरिकाला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते.

हेही वाचा-माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डेंग्युची लागण; प्रकृतीत सुधारणा- एम्स

Last Updated : Oct 16, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.