ETV Bharat / bharat

ऑक्सिजन 'मॉकड्रिल' प्रकरणात पारस रुग्णालयाच्या संचालकाला क्लीन चिट

आग्रा हॉस्पिटलमध्ये 'मॉक ड्रिल'साठी ऑक्सिजन पुरवठा खंडित केल्याचा पुरावा आढळला नसल्याचे उत्तर प्रदेशच्या डेथ ऑडिट कमिटीने अहवालात म्हटलं आहे. कमिटीने पारस रुग्णालयाच्या संचालकाला क्लीन चिट दिली आहे.

author img

By

Published : Jun 19, 2021, 10:28 AM IST

डेथ ऑडिट कमिटी
डेथ ऑडिट कमिटी

लखनऊ - कोरोना रुग्णांना देण्यात येणारा प्राणवायूचा पुरवठा पाच मिनिटांसाठी खंडित करून मॉक ड्रिल घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर राज्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाची चौकशी उत्तर प्रदेशच्या डेथ ऑडिट कमिटीने केली असून पारस रुग्णालयाच्या संचालकाला क्लीन चिट दिली आहे. आग्रा स्थित पारस रुग्णालयात कोरोना रुग्णांना देण्यात येणारा प्राणवायूचा पुरवठा पाच मिनिटांसाठी खंडित करून मॉक ड्रिल केले, असे एका खासगी रुग्णालयाचा मालक सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, हे सत्य नसून रुग्णालयात 'मॉक ड्रिल'साठी ऑक्सिजन पुरवठा खंडित केल्याचा पुरावा आढळला नाही, असे उत्तर प्रदेशच्या डेथ ऑडिट कमिटीने अहवालात म्हटलं.

मॉक ड्रिलसाठी ऑक्सिजनचा पुरवठा खंडित केल्याने 22 रूग्णांचा मृत्यू झाला हे सत्य नाही. ड्रिलसाठी कोणाचाही ऑक्सिजन खंडीत करण्यात आला नाही. समितीच्या अहवालानुसार तपास अधिकाऱ्यांना 25 एप्रिल रोजी 149 ऑक्सिजन सिलिंडर होते. त्यातील 20 आरक्षित होते. तर 26 एप्रिल रोजी 121 सिलिंडर होते, त्यापैकी 15 आरक्षित होते. रूग्णालयाचे रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा पुरेसा होता, असे अहवालात म्हटलं आहे.

कमिटीला चौकशीदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन अभाव कारणास्तव रूग्णांना डिस्चार्ज दिल्याचे आढळले. असे करणे हे साथीचा रोग कायदा प्रोटोकॉलचे उल्लघंन असल्याचे समितीने म्हटलं आहे. साथीच्या आजार अधिनियम प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पोलीस रुग्णालयावर आवश्यक कारवाई करतील, असेही डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालात म्हटले आहे.

काय प्रकरण?

26 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कथित 'मॉकड्रिल' दरम्यान 22 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #Agra ट्रेन्डिंग होते. पाच मिनिटांसाठी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आल्याचे एक डॉक्टर सांगत असल्याचे व्हिडिओ पाहायला मिळाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.