ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यात लसीकरण झाल्यानंतर (PM Narendra Modi Picture Not Covid Vaccination Certificate) मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आता असणार नाही.(Assembly elections in five states)विधानसभा निववणुका जाहीर केल्यानंतर या (Covid Vaccination Certificate) पाच राज्यात आचारसहिंता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय या राज्यात लागू झाला आहे अशी माहिती निवडणुक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संदर्भाने महत्वपुर्ण स्कॅनर कोड लावण्याची शक्यता
पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंंड या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणुक आयोगाकडून नुकत्याच या राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. (The Election Commission Announced on Saturday) त्या पार्श्वभूमीवर या राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा जो फोटो असोत तो आता असणार नाही. त्या ठिकाणी केंद्रीय आरोग्य विभार कोरोनाच्या संदर्भाने महत्वपुर्ण स्कॅनर कोड लावण्याची शक्यता आहे.
हा निर्णय पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान लागू असणार
मार्च 2021 मध्ये काही राजकीय पक्षांनी प्रमाण पत्रावरील मोदी यांच्या फोटोवरून टीका केली होती. त्यानंतर निवडणुक आयोगाने त्यावेळी आसाम, केरळ, तमिलनाडु, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी या राज्यांच्या निवडणुकांतही लसीकरण प्रमाणपत्रावरून निवडणुक काळात फोटो हटवला होता. तोच निर्णय आता होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान लागू असणार आहे.
दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार
शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उत्तर प्रदेशात सात टप्प्यात पंजाब, उत्तराखंड, गोवा मध्ये एका तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत.
1 राज्य – उत्तर प्रदेश
14 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – 7 टप्पे
कधी कधी मतदान? – 10 फेब्रुवारी , 14फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
2 राज्य – पंजाब
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
3 राज्य – उत्तराखंड
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
4 राज्य – गोवा
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
5 राज्य – मणिपूर
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – दोन टप्प्यात
कधी मतदान? – 27 फेब्रुवारी, 3 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
हेही वाचा - Goa Congress Candidate Second List : गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर