धर्मशाला - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी जात आहेत. ही संख्या एवढी आहे, की स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. कोरोनाच्या या संकटात अनेक दुर्देवी घटना समोर आल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने आपल्या खाद्यांवर उचलून स्मशानभूमीत नेल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मदतीला गावातील कोणीही पुढे न आल्याची माहिती आहे.
अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलाने आईचा मृतदेह खांद्यावर घेतला आणि स्मशानभूमीत पोहोचला. एकट्याने आईवर अत्यंसस्कार केले. यावेळी त्याला फक्त पत्नीने साथ दिली. मुलगा आईचा मृतदेह खाद्यांवर घेऊन जात होता. तर त्याच्या मागे पत्नी आपल्या एका मुलासोबत येत होती. पत्नीच्या एका हातामध्ये सासूच्या अंत्यसंस्काराचे सामान तर कडेवर दीड वर्षाचा मुलगा होता.
या संपूर्ण प्रकरणावर शिमला ग्रामीणचे काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचलची संस्कृती आपल्याला हे शिकवत नाही, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी बाब आहे, असे विक्रमादित्य सिंह यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं.
हेही वाचा - 'लव्ह यू जिंदगी' म्हणणाऱ्या तरुणीचा कोरोनाने घेतला बळी; नेटकरी झाले भावूक