नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.
आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
लोकांनी त्यांना धडा शिकवावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनेक रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करण्यास नकार दिला होता. हे सर्वांना माहित आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नाही, याचा अर्थ त्यांनी पाहिले नाही अथवा ऐकले नाही. लोकांनी त्यांना धडा शिकवावा, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने दोन अपघातग्रस्त तरुणांचे वाचले प्राण
सर्व वाईट गोष्टींसाठी केंद्र सरकारला दोष
छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी. एस. सिंह देव म्हणाले, की दिल्ली आणि काही राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, सरकारकडून कशी आकडेवारी दिली जाते, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. आरोग्य हा राज्यांचा विषय असल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. अन्यथा, त्यांना प्रत्येक गोष्ट स्वत:च्या नियंत्रणात आणायची असते. सर्व चांगल्या गोष्टींचे केंद्र सरकार श्रेय घेते. मात्र, सर्व वाईट गोष्टींसाठी राज्य सरकारला दोष दिला जातो.
-
सिर्फ़ ऑक्सीजन की ही कमी नहीं थी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
संवेदनशीलता व सत्य की भारी कमी-
तब भी थी, आज भी है। pic.twitter.com/DPhjih2jbX
">सिर्फ़ ऑक्सीजन की ही कमी नहीं थी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2021
संवेदनशीलता व सत्य की भारी कमी-
तब भी थी, आज भी है। pic.twitter.com/DPhjih2jbXसिर्फ़ ऑक्सीजन की ही कमी नहीं थी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2021
संवेदनशीलता व सत्य की भारी कमी-
तब भी थी, आज भी है। pic.twitter.com/DPhjih2jbX
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला आहे. फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती. सत्य आणि संवदेनशीलतेची कमतरता होती व आजही आहे, असे गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-First bird flu death धक्कादायक! बर्ड फ्ल्यूने १२ वर्षाच्या मुलाचा दिल्लीत मृत्यू