ETV Bharat / bharat

सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करा, राहुल गांधींचे टि्वट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करून केंद्र सरकारला सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली. तसेच त्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्नांवरून केंद्रावर टीका केली.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Apr 11, 2021, 10:17 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून केंद्र सरकारवर टीका केली. देशात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. सरकारला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करायला हवा, असेही ते आणखी एक टि्वट करून म्हटलं. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.

कोरोनावर नियंत्रण नाही, लसीचा पुरवठा नाही, रोजगार नाही, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, एमएसएमई सुरक्षित नाही, मध्यमवर्गीय समाधानी नाही, असे राहुल गांधी टि्वटमध्ये म्हणाले. तसेच आंबा खाणे ठिक होते. मात्र, सामान्य नागरिकांना तरी सोडायचे, अशी उपहासात्मक टीका राहुल गांधींनी केली. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची एप्रिल 2019 मध्ये मुलाखत घेतली होती. त्यात आपल्याला आंबे खाण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले होते. अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गैर राजकीय प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली होती. याचाच संदर्भ घेत राहुल गांधींनी टीका केल्याचे बोलले जात आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करायला हवा, असेही आज राहुल गांधी म्हणाले. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी -

राहुल गांधी यांनी शनिवारीही केंद्रावर टीका केली होती. केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर दुसरी लाट पसरली आहे. स्थलांतरीत कामगारांना पुन्हा आपल्या गावाची वाट धरावी लागली आहे. त्यांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे. सामान्य नागरिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे करणे गरजेचे आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे, असे खोचक टि्वट त्यांनी केले होते.

राहुल गांधींचे मोदींना पत्र -

गेल्या शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना परिस्थिती आणि लसीचा तुटवडा, याबाबत सवाल केले होते. कोरोना लसीच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. इतर लसींनाही वेगवान मार्गाने मान्यता देण्यात यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. तसेच 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण महोत्सव साजरा करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा संदर्भ देत, राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीची कमतरता ही गंभीर समस्या आहे, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा - मोठी बातमी! केंद्राकडून रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.