नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोव्हिड 19 सारखा संसर्ग आणि व्हेक्टर बॉर्न रोग हे प्राणघातक असल्याचे परिपूर्ण पुरावा आढळला नसल्याचे म्हटले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत शुक्रवारी दिली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना व्हेटर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रॅमनुसार (एनव्हीबीडीसीपी) तांत्रिक व आर्थिक मदत सुरू ठेवणार आहे. तसा राष्ट्रीय आरोग्य मिशनचा (एनएचएम) प्रस्ताव असल्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १ हजार ८०० कोटींचे नुकसान; अशोक चव्हाण यांची माहिती
आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत काय माहिती दिली?
- 2020 मध्ये मलेरिया झालेले 99.97 रुग्ण बरे झाले. मलेरियाचे रुग्ण आणि मृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.
- 2020 मध्ये मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण 84.4 टक्क्यांनी कमी झाले आहे.
- मलेरियाने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण हे 2015 च्या तुलनेत 83.6 टक्क्यांनी कमी झाले आहे.
- 2020 मध्ये 99.82 रुग्ण हे डेंग्यूमधून बरे झाले आहेत. तर चिकनगुनियामधून बरे होण्याचे प्रमाण हे 100 टक्के आहे.
- कोणत्याही राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये चिकनगुनियामुळे मृत्यू झाल्याची नोंद मिळालेली नाही.
- व्हेक्टर बॉर्न रोग हे जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांमध्ये दिसतात. त्यामुळे अशा आजारांबाबत लढा देण्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे.
- देशात मलेरियामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर डेंग्युमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. देशामध्ये 28 जुलैअखेर 46,764 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा- सीमावादावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन सैन्यात उद्या चर्चेची बारावी फेरी
दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार कोरोनाच्या मृत्युची आकडेवारी ४.१४ लाख आहे.