पाटना - पाटना एनआयटीचा विद्यार्थी अभिषेक कुमार याला अॅमेझॉन कंपनीने ( Abhishek of NIT Patna Amazon package ) 1.08 कोटी वार्षिक पगाराचे पॅकेज दिले आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला. जमुई येथील रहिवाशी असणाऱ्या अभिषेकच्या आई-वडिलांनी त्याला स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली. अभिषेक हा मूळचा जमुईच्या झाझा ब्लॉकमधील जमुखैरैया गावचा ( NIT Patna ) रहिवासी आहे. अभिषेकच्या यशाचा गावकऱ्यांनाही अभिमान आहे.
एनआयटी पाटनामधून अभिषेकने घेतले शिक्षण - झाझा ब्लॉकच्या जमुखैरैया गावातील रहिवासी असलेल्या अभिषेकने एनआयटी पाटनामधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणादरम्यान अभिषेकला ही नोकरी ( Abhishek From NIT Patna To Amazon ) मिळाली. एनआयटी पाटनाने 2022 मध्ये सातत्याने प्लेसमेंटचे रेकॉर्ड मोडले ( NIT Patna Placement record ) आहेत. फेसबुक, गुगलनंतर आता अॅमेझॉन बर्लिनने सीएसई शाखेचा विद्यार्थी अभिषेक कुमारला १.०८ कोटींचे पॅकेज दिले आहे. अॅमेझॉनमध्ये प्रथमच एनआयटीमधून विद्यार्थ्यांना संधी दिली आहे.
अभिषेक म्हणाला, की माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिले, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. ज्यांना त्यांच्या आयुष्यात चांगले करायचे आहे त्यांनी त्यांच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. एक दिवस त्यांना नक्कीच यश मिळेल. कष्टकरी लोकांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही'- अभिषेक, एनआयटी पाटणा येथील विद्यार्थी
सप्टेंबरमध्ये कंपनीत होणार रुजू- अभिषेकने 14 डिसेंबर 2021 रोजी Amazon साठी कोडिंग चाचणी दिली आणि 13 एप्रिल रोजी मुलाखतीच्या तीन फेऱ्या दिल्या. 21 एप्रिल 2022 रोजी त्याला Amazon कडून निवडीचे पत्र मिळाले. त्याची निवड झाल्यानंतर अभिषेकच्या घरी अभिनंदन करण्यासाठी झुंबड उडाली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये अभिषेक बर्लिन, जर्मनी येथे जाऊन नोकरीला रुजू होणार आहे.
कोण आहे अभिषेक - मूळचा जमुई जिल्ह्यातील झाझा येथील विद्यार्थी आहे. अभिषेकबद्दल सांगितले जाते की, त्याला लहानपणापासूनच वाचनाची आणि लेखनाची खूप आवड होती. याच कारणामुळे लहानपणी तो आई-वडिलांकडून लॅपटॉप, मोबाईल यांसारखी गॅजेट्स घेण्याचा हट्ट करायचा. इंजिनीअरिंग करण्याआधीही त्याला कोडिंगबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. जेव्हा त्याने इंजिनीअरिंगमध्ये कोडिंगचा अभ्यास केला तेव्हा त्याला कोडिंगचा खूप आनंद होऊ लागला. त्याने सांगितले की तो दुसऱ्या वर्षाला होता आणि तेव्हापासून कोडिंग सुरू केले. त्यांनी चांगल्या प्रोजेक्ट्सवर कोडिंगचे कामही केले आहे.
कठोर परिश्रमामुळे यश - अभिषेक म्हणाला की, सतत कोडिंग आणि मेहनतीमुळे आज हे यश मिळाले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या पालकांना दिले. अभिषेकने सांगितले की, त्याच्या पालकांनी नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला. पालकांनी त्याला नेहमी प्रोत्साहन दिले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सतत मेहनत करत राहिला. लवकरच त्याला यश मिळाले.
कोटामध्ये राहून इंजिनीअरिंगची तयारी - अभिषेकने 1 वर्ष कोटामध्ये राहून इंजिनीअरिंगची तयारी केली. मेहनतीचा परिणाम असा झाला की 2018 मध्ये अभिषेकला एनआयटी पाटनामध्ये कॉम्प्युटर शाखेत प्रवेश मिळाला. अभियांत्रिकीच्या अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच त्यांना कोडिंगची खूप आवड होती. त्याने कोडिंगचा अभ्यास मनापासून केला. त्याचे वडील कोर्टात वकील आहेत. अभिषेकची आई गृहिणी आहे.
पेटीएमची नाकारली ऑफर - अभिषेकच्या आई आणि वडिलांना त्यांच्या मुलाचा अभिमान आहे. ते म्हणाले की, मुलगा अभिषेकची अॅमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीत निवड होणे ही मोठी गोष्ट आहे. इंटर्नशिपसाठी गेल्या वर्षी पेटीएममध्ये निवड झाली होती. त्यानंतर स्वत: अभिषेकने सांगितले की पेटीएमकडून वार्षिक 16 लाख रुपये ऑफर दिली होती. पण मी तिथे रुजू झालो नाही. पेटीएम जॉईन केले असते तर आज एवढे मोठे स्थान मिळवू शकलो नसतो.
हेही वाचा-Assaulting Tribal Woman : आदिवासी महिलेला विवस्त्र करून 9 जणांची मारहाण; कर्नाटकातील धक्कादायक घटना