तिरुवनन्तपुरम Nipah Alert In Kozhikode : केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे दोन नागरिकांचा संशयित मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे आरोग्य विभागानं सोमवारी संध्याकाळी अॅडव्हायझरी जारी केली. या अॅडव्हायझरीमध्ये आरोग्य विभागानं निपाह विषाणूमुळे दोन नागरिकांचा संशयित मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. विशेष म्हणजे मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
पहिल्या संशयित रुग्णांचा 30 ऑगस्टला झाला मृत्यू : केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गानं दोन नागरिकांचा संशयित मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यातील पहिला संशयित रुग्ण 30 ऑगस्टला दगावला आहे. मात्र या रुग्णाची तपासणी करण्यात आली नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं. त्यामुळे पहिला संशयित रुग्ण दगावल्यानंतर त्या निपाह विषाणू संसर्गानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यानंतर निपाह विषाणू संसर्गानं दुसरा संशयित रुग्ण दगावल्यानं मात्र मोठी खळबळ उडाली.
आज येणार दुसऱ्या रुग्णाचा अहवाल : निपाह विषाणूच्या संसर्गानं संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आरोग्य विभागानं कोझिकोडमधील नागरिकांना दक्षता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. दुसऱ्या रुग्ण निपाह विषाणूच्या संसर्गानं दगावल्याचा आरोग्य विभागाला संशय आहे. त्यामुळे त्याच्या विविध चाचण्या आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल आज सादर होणार आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतरच हा मृत्यू निपाह विषाणूच्या संसर्गानं झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.
आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक : कोझिकोडमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गानं दोन रुग्णांचे संशयित मृत्यू झाल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आरोग्य विभागानं कोझिकोडमध्ये अॅडव्हायझरी जारी केली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचंही आरोग्य विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा :