ETV Bharat / bharat

Navratri 2022 : जाणून घ्या, महाराष्ट्रातील नऊ शक्तीपिठांविषयीची माहिती आणि महती - नवरात्री पूजा

येत्या सोमवारी 26 सप्टेंबर रोजी नवरात्र (Navratri 2022) महोत्सवास सुरुवात होते आहे. तेव्हा जाणुन घेऊया महाराष्ट्रातील नऊ शक्तीपिठांविषयीची (Nine Shaktipithas in Maharashtra Navratri Puja) माहिती.

Navratri 2022
महाराष्ट्रातील नऊ शक्तीपिठ
author img

By

Published : Sep 24, 2022, 9:31 PM IST

Updated : Sep 26, 2022, 9:00 AM IST

कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, नाशिकची सप्तश्रृंगी देवी, मुंबा देवी मंदिर, वज्रेश्वरी मंदिर, मांढरदेवी काळूबाई मंदिर, चतुर्श्रृंगी मंदिर, अमरावतीची एकविरा देवी ही सर्व शक्तिपीठं तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारे आहेत. कारण हे सगळे स्थळ जागृत देवस्थान आहेत. यांच्याशी निगडित बऱ्याच आख्यायिका आहेत. विशेषत: नवरात्रात (Navratri 2022) इथे भाविक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्ती पीठांना भेट देतात. इथे नवरात्रात खूप गर्दी असते. आज आपण या शक्तिपीठांबद्दल (Nine Shaktipithas in Maharashtra Navratri Puja) जाणून घेऊया.

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर : कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजेच आपली अंबाबाई हे सर्वात जुने देऊळ असून; या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असे केलेले आहेत. कोल्हापूरची अंबाबाईला 'महाराष्ट्राची कुलस्वामिनी' म्हणतात. ज्या वेळी मुघलांचे शासन होते त्या वेळी त्यांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व देऊळांचा विध्वंस आणि नासधूस केली. त्यावेळी या देऊळाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्याने बरीच वर्षे लपवून ठेवली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ई.स. 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली. या देऊळात महालक्ष्मी आणि त्यांचा समोर गरुडमंडपात गरुड स्थापित केले गेले आहे. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्रॅम आहेत. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे.

तुळजाभवानी : तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून; हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की, देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो.

रेणुका देवी माहूर गड : माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजानी बांधले असे. आख्यायिका आहे की, दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला. माता रेणुकाची एक कथा आहे- या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले, शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर' म्हटले जाऊ लागले. आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.

सप्तशृंगी देवी - सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वर 4800 फूट उंचीवर सप्तशृंगगडावर वास्तव्यास आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. या मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवी - देवतांनी त्याची याचना केली. त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी. या महिरपीत देवीची मूर्ती आठ फुटी उंच मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे.

मुंबा देवी मंदिर : मुंबा देवी मंदिर हे मुंबईतील भुलेश्वर येथे स्थित आहे, ज्यावरून मुंबई शहर हे नाव पडले. मुंबा देवी ही येथे राहणाऱ्या कोळी समाजाची कुळदेवी आहे. 400 वर्षे जुन्या या मंदिराची मुंबईत ख्याती आहे. हे मंदिर अंबा देवीच्या सन्मानार्थ बांधले गेले. मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. पहिले मुंबादेवी मंदिर बोरी बंदर येथे होते आणि ते १७३९ ते १७७० च्या दरम्यान नष्ट झाल्याचे मानले जाते. विनाशानंतर भुलेश्वर येथे त्याच ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यात आले. देवी पृथ्वी मातेचे रूप धारण करते आणि अजूनही उत्तर भारत-गंगेच्या मैदानातील आणि दक्षिण भारतातील हिंदू लोकसंख्येद्वारे तिची पूजा केली जाते. मंदिर देवी पार्वती तिच्या मच्छीमार रूपात समर्पित आहे. महाकालीचे रूप धारण करण्यासाठी, देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रता प्राप्त करावी लागली. त्यावेळी भगवान शिव यांनी देवी पार्वतीला मासेमारीच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचा आग्रह केला. ज्याद्वारे ती चिकाटी आणि एकाग्रतेची क्षमता प्राप्त करू शकते कारण कोळी मासेमारी शिकत असताना हे दोन्ही गुण प्राप्त करतात. देवी पार्वती नंतर मच्छीमार स्त्रीच्या रूपात अवतरली आणि मच्छीमारांच्या जागी आश्रय घेतला. देवी पार्वती तिच्या लहान वयात मत्स्य म्हणून ओळखली जात होती आणि नंतर तिला तिच्या मच्छीमार रूपात मुंबा म्हणून ओळखले जाऊ लागले. मच्छिमारांच्या मार्गदर्शनाखाली चिकाटी आणि एकाग्रता शिकण्यात मुंबाने स्वतःला समर्पित केले कारण ते एकाग्रता आणि चिकाटीने मासे पकडण्याच्या त्यांच्या व्यवसायात उत्सुक होते. जेव्हा मुंबाने चिकाटी आणि एकाग्रतेच्या तंत्रात प्रभुत्व मिळवले, तेव्हा ती जिथून आली होती. तिथून तिच्या घरी परतण्याची वेळ आली. भगवान शिव मच्छीमाराच्या रूपात आले आणि त्यांनी मुंबाशी लग्न केले. नंतर मच्छीमारांनी तिला तिथे कायमचे राहण्याची विनंती केली आणि म्हणून ती ग्रामदेवी (ग्रामदेवता) बनली. तिथल्या लोकांकडून तिला "आई" असे संबोधले जात असल्याने. तिला 'मुंबा आई' म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि तिच्यावरून मुंबई हे नाव पडले.

वज्रेश्वरी मंदिर : मुंबईपासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेले वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर आहे. नवरात्रीच्या दिवसात येथे मोठ्या उत्साहात वज्रेश्वरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस देवीची आराधना करून मोठी जत्रा भरवली जाते. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गावाला गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. त्रेता युगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या हातात खड्ग आणि गदा आहे. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला.

मांढरदेवी काळूबाई मंदिर : देवी काळूबाईचे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई भागात डोंगरावर 4650 फूट उंचीवर आहे. हे हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध मंदिर असून; दरवर्षी जानेवारी महिन्यात काळूबाई जत्रा भरवली जाते. सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली.तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळुबाईचे पुजन केले होते.अशी एक दंतकथा सांगितली जाते.

चतुर्श्रृंगी मंदिर : पुणे सेनापती बापट रोडवरील डोंगराच्या कुशीत वसलेले पुण्याचे प्रसिद्ध चतुश्रृंगी मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. तुमच्या महाराष्ट्र सहलीत या देवींच्या मंदिरांना भेट द्या आणि श्रद्धेची भावना अनुभवा. चतुःशृंगी म्हणजे चार शिखर असलेला पर्वत. हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी १७०हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत. यात अष्टविनायकाच्या आठ लघु मूर्तींचा समावेश आहे. ही लहान मंदिरे चार स्वतंत्र टेकड्यांवर आहेत.

एकविरा देवी : अमरावतीच्या या अंबादेवी मंदिरात रूक्मिणीने देवीला साकडे घालून इच्छित वराचं दान मागितलं. प्रकटलेल्या अंबादेवीने रूक्मिणीला फुलांची माला दिली. लग्नाला विरोध करणाऱ्या रूक्मिणीच्या भावाला पराजित करून श्रीकृष्ण तिला आपल्यासोबत घेऊन गेला. रूक्मिणीलाही जिचे आशीर्वाद प्राप्त झाले ती ही अंबा देवी होय. श्रीकृष्णाच्या काळातील अंबादेवीचं देवस्थान इतक्या कालावधीनंतर तसंच टिकून आहे. अनेक वर्ष हे मंदिर एका लहानशा ओट्यावर चार खांबांच्या आधारावर उभं होतं. अमरावती मोठ्या शहरात परावर्तित झालं. तेव्हा हळूहळू त्यास आजचं सुंदर स्वरूप प्राप्त झालं. शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराची बांधणी जुन्या पद्धतीची आहे. इ.स.1660 चे सुमारास जनार्दन स्वामी नावाचा सत्वपुरुष ह्या ठिकाणी राहत होता. त्या ठिकाणी असलेल्या एक विहिरीला एक माणूस बसेल एवढा कोनोडा होता, त्या मध्ये तपशर्या करण्यासाठी बसत. जगदंबेचे दर्शन केल्या शिवाय ते अन्न पाणी सुद्धा घेत नव्हते. एक दिवस पावसाळ्यात नदीला पूर आल्याने तीन दिवस त्यांचे दर्शन झाले नाही. पण दर्शन झाल्याशिवाय अन्न घेणार नसल्याने जगदंबेला मार्ग काढावा लागला व साक्षात्कार झाला. त्यात देवीने म्हणटले की, विहिरीच्या पाण्यावर जो बाण आहे ते माझेच स्वरूप आहे. तिथे माझी पूजा कर. तेव्हा जनार्दन स्वामी संतोषले. त्यांनी पूजा करून उपवास सोडला पुढे हीच मूर्ती श्री एकविरादेवी म्हणून नावा रुपास आली. या देवीच्या दर्शनाला हजारो भाविक मोठ्या रांगा लावतात, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी खणा नारळाची ओटी भारतात.

Last Updated : Sep 26, 2022, 9:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.