ETV Bharat / bharat

एनआयएचे महाराष्ट्रात 43 ठिकाणी छापे: राज्यभरातून अनेकांना घेतलं ताब्यात - NIA raids Pune

NIA raids today एनआयएनं कर्नाटकतील एक, पुण्यातील दोन, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरातील नऊ आणि भाईंदरमध्ये एक ठिकाणी छापे टाकले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेनं हे महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस दलांच्या समन्वयानं छापे टाकले आहेत.

NIA raids today
NIA raids today
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 9:06 AM IST

Updated : Dec 9, 2023, 4:53 PM IST

नवी दिल्ली/ठाणे NIA raids today - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयएने) दहशतवाद्यांकडून घातपात होण्याच्या शक्यतेनं मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ४४ ठिकाणी छापे टाकले आहेत. भिवंडीतही एनआयएकडून कारवाई सुरू आहे. शहरातील तीनबत्ती, शांतीनगर आणि इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर महाराष्ट्रातील कारवाईत एकूण 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.

  • एनआयनं संशयितांना ताब्यात घेतलं आहे. शाकिब नाचन, हासिब मुल्ला , मुसाब मुल्ला , रेहान सुसे , फरहान सूसे , फिरोझ कुवार , आदिल खोत , मुखलिस नाचन , सैफ आतिक नाचन ,याह्या खोत राफिल नाचन, राझील नाचन , शकूब दिवकर , कासीफ बेलारे आणि मुंझिर केपी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
    • Of the total 44 locations being raided by the NIA since this morning, the agency sleuths have searched 1 place in Karnataka, 2 in Pune, 31 in Thane Rural, 9 in Thane city and 1 in Bhayandar. https://t.co/vKl7119DcV

      — ANI (@ANI) December 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकानं सकाळी ८.३० च्या सुमारास मिरा भाईंदर परिसरात छापा टाकला. यामध्ये एका व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. मिरारोडच्या नया नगर भागात ही छापेमारी करण्यात आली. एनआयएनं संशयित व्यक्तीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

कोंढव्यातून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त- पुण्यातील कोंढवा येथील तालाब फॅक्टरी इथे इसेन्शिया सोसायटीमध्ये शोएब अली शेख यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. यात एनआयएकडून लॅपटॅाप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तर पुण्याच्या मध्यवस्ती ठिकाण असलेल्या मोमीनपुरा येथील गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अली यांच्या घरी केलेल्या छापेमारीत मोबाईल लॅपटॅाप आणि एक सत्तूर जप्त करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये एनआयएनं दाखल केलेल्या इसिस संबंधांतील प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं ही छापेमारी करण्यात आली.

तरुणांची दहशतवादी गटात भरती- अल-कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांकडून देशात कट्टर विचारसरणीला प्रोत्साहन देत हिंसाचार घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा एनआयएला संशय आहे. दहशतवादी संघटनांनी देशात इस्लामिक सत्ता स्थापन करण्यासाठी धार्मिक वर्ग आयोजित केले होते. त्यामध्ये तरुणांच्या मनात विष पेरत दहशतवादी गटात भरती केले होते. त्यानंतर एनआयएकडून छाप्यांचं सत्र सातत्यानं सुरू आहे. एनआयएनं भिवंडीच्या पडघा गावात मोठी कारवाई करत महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं एनआयएनं ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतलं आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.

यापूर्वी पाच दहशतवाद्यांना अटक- राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं ११ ऑगस्टला स्थानिक पोलिसांच्या मदतीनं भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात छापेमारी केली होती. या छापेमारीत एनआयएनं 'आयसिस' दहशतवादी संघटनेशी संबंधीत आरोपीला अटक केली. शमील साकिब नाचण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पडघा-बोरीवलीमधून यापूर्वी चार जणांना दहशतवादी कारवाईच्या संशयावरून अटक करण्यात आली. यामध्ये शमीलचा नातेवाईक अकिब नाचण याला शरजील शेख, (३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (३६) अशी संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत.

संशयित दहशतवाद्यांवर काय आहे आरोप? यापूर्वी एनआयएच्या पथकानं शमीलला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली. शमील हा स्फोटके बनवून त्याची चाचणी करत असल्याचं तपासात समोर आलं. चार जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केली. एवढेच नव्हे तर चौघांनी तरुणांची माथे भडकावून त्यांना आरडीएक्स आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. हिंसाचार घडवून आणण्याकरिता 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील दिली होती. यामध्ये आयईडी आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे यांची माहिती दिली होती.

२८ जूनला टाकली होती धाड : २८ जून रोजी एनआयए पथकाने आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयीतांच्या घरांची झडती घेतल्यानंतर दहशतवाद्यांचे कनेक्शन समोर आले होते. एनआयएच्या पथकाने आरोपींच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि आयसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त केले होते. याद्वारे आरोपींचे इसिसशी थेट संबंध असल्याचे समोर आले होते.

  • ठाणे जिल्ह्यातून यापूर्वी पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक : २०१४ मध्ये कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये भरती झाले होते. तर गेल्या वर्षी भिवंडी शहरातून दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात दहशतवाद्यांचे वाढते कनेक्शन पाहता चिंता वाढली आहे.

हेही वाचा-

  1. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांना अंतरिम जामीन मंजूर
  2. Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती

Last Updated : Dec 9, 2023, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.