ETV Bharat / bharat

Coimbatore blast case : कोईम्बतूर कार सिलेंडर बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची तीन राज्यात छापेमारी

कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर 23 ऑक्टोंबरला कारमध्ये सिलेंडर बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात जमेशा मोबीन या तरुणाचा मृत्यू झाला होता. जमेशा हा इसीस या संघटनेशी संबंधित असल्याचे एनआयएच्या तपासातील कागदपत्रावरुन उघड झाले होते. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केली आहे.

Coimbatore blast case
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 15, 2023, 4:41 PM IST

चेन्नई : कोईम्बतूर शहरातील एका कारमध्ये झालेल्या सिलेंडर बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने तीन राज्यात छापेमारी केली आहे. 23 ऑक्टोंबरला कोईम्बतूर शहरात हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता. या प्रकरणी एनआयएने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये छापेमारी केली आहे. एनआयएने तब्बल 60 ठिकाणांवर छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर झाला होता स्फोट : कोईम्बतूर शहरातील कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर 23 ऑक्टोंबरला कारमध्ये सिलेंडर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात बंदी घातलेल्या इसीस या संघटनेशी संबंधित असलेल्या जमेशा मोबीन या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण तामिळनाडूच्या पोलीस दलाकडे सोपवण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे प्रकरण सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आले. मात्र संवेदनशील प्रकरण असल्याने एनआयएकडे या सिलेंडर स्फोटाचा तपास देण्यात आला. इसीसशी संबंधित असलेल्या जमेशा मुबीन याचा या स्फोटात संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने याबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत.

धार्मीक ठिकाणांवर आत्महघातकी हल्ला : कोईम्बतूर शहरातील कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर 23 ऑक्टोंबरला कारमध्ये सिलेंडर बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचे एनआयए तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एनआयएने तीन राज्यातील 60 ठिकाणी छापेमाीर केली आहे. या ठिकाणावरुन एनआयएने काही महत्वाचे कागदपत्र हाती लागले आहेत. यातून कोईम्बतूर येथे झालेला स्फोट हा आत्महघातकी हल्ला असल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा स्फोट घडवून आणण्यासाठी संशयीतांनी स्फोटके आणि साहित्य ऑनलाईन विकत घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

11 संशयीतांच्या आवळल्या मुसक्या : एनआयएने केलेल्या छापेमारीत 11 संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यात मोहम्मद अझरुद्दीन, अबसार खान, मोहम्मद तल्हा, मोहम्मद रियाज, पेरोज इस्माईल, मोहम्मद नवाज, इरातुल्ला, सनोबर अली, मोहम्मद तौफीक, उमर फारुख, फेरोज खान यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने या संशयीतांना विविध ठिकाणावरुन अटक करुन घटनास्थळावर चौकशीसाठी नेले आहे. त्यासह या आरोपींना कुठे कुठे स्फोटासाठी बैठकी घेतल्या, तेथेही एनआयएने तपास सुरू केला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी : कोईम्बतूर शहरात कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर झालेल्या सिलेंडर स्फोटाचे इसीस कनेक्शन पुढे आल्याने एनआयएने तीन राज्यात छापेमारी केली. या प्रकरणात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे एनआयएचे अधिकारी तामिळनाडू, कर्नाटक, आणि केरळ राज्यात शोधमोहीम राबवत आहेत. इसीसशी संबंधित असलेल्या संशयीतांच्या एनआयएनचे अधिकारी मुसक्या आवळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तमिळनाडूमध्ये एनआयएचे अधिकारी चेन्नई, कोईम्बतूर, मायिलादुथुराई, तिरुनेलवेली आणि तेनकासीसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - Rape Attempt with Footballer: महिला फुटबॉल खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न.. फिरायला निघाली अन् नराधमाने शेतातच ओढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.