ETV Bharat / bharat

NIA Raids On PFI : पॉप्युलर फ्रंटच्या कार्यालयावर एनआयएची छापेमारी, बडे मासे लागणार गळाला ? - पीएफआय

राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी चेन्नईसह विविध ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( PFI ) संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. सध्या ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मदूराईच्या क्षेत्रीय अध्यक्षाच्या घरावरही छापेमारी करण्यात येत आहे.

NIA Raids On PFI
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 9, 2023, 10:29 AM IST

चेन्नई : राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( PFI ) संबंधित असलेल्या विविध ठिकाणावर छापेमारी केली आहे. यात चेन्नईमध्ये राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तिरुवोटीयुर धनगल न्यू कॉलनी भागातील अब्दुल रझ्झाकच्या घरावर छापेमारी केली आहे. त्यासह एनआयएने थेनी, मदुराई आणि दिंडीगुलसह तब्बल आठ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

मदुराईच्या क्षेत्रीय अध्यक्षाच्या घरावरही छापेमारी : राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ( NIA ) तामिळनाडूतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणावर छापेमारी केली आहे. यात राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या NIA अधिकाऱ्यांचे पथक दिंडीगुल जिल्ह्यातील पलानी नेताजी नगरातही पोहोचले आहे. नेताजी नगरात राहणारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया मदुराईचे क्षेत्रीय अध्यक्ष कैसर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे.

केरळ कर्नाटकात पसरवला दहशतवाद : आज सकाळी एनआयएने पीएफआयच्या तब्बल आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. बेकायदेशीर कृत्य करण्यासह पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने दहशतवादाचे समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत गृह मंत्रालयाने 28 सप्टेंबर 2022 रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर ( PFI ) पाच वर्षासाठी बंदी घातली आहे. केरळ आणि कर्नाटकात दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप पीएफआयवर करण्यात आला होता. त्यानंतर NIA च्या रडारवर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना बरखास्त केली आहे.

एनआयएने 37 बँक खाती गोठवली : देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरुन एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची मार्च 2023 पर्यंत तब्बल 37 बँक खाती गोठवली आहेत. गेल्या वर्षी एप्रिलपासून संस्थेशी संबंधित 19 संशयितांची 40 बँक खाती गोठवण्यात आली होती. गुवाहाटी, सुंदीपूर, इंफाळ, कोझिकोड, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद आणि कुरनूलसह देशभरात या बँक खात्यांवर कारवाई करण्यात आली.

सरकारच्या विरोधात सशस्त्र संघर्ष : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने पीएफआयने कट्टरपंथी बनवून भारत सरकारच्या विरोधात सशस्त्र संघर्ष पुकारण्यासाठी एक सुनियोजित रणनीती आखली होती. या संघटनेच्या संशयितांनी आपली सशस्त्र संघर्षाची रणनीती बनवल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे या संघटनेवर एनआयएने छापेमारी सुरू केली. कट्टरतावादी तरुणांना शस्त्रे आणि शस्त्रास्त्रे वापरण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या संघटनेद्वारे देशभरात आयोजित केलेल्या विविध शस्त्र प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षित मिलिशिया तयार करण्याचा उद्देश असल्याचाही एनआयएच्या अधिकाऱ्यांचा आरोप आहे.

हेही वाचा -

Election Commission Notice To Sonia Gandhi : कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण

Jio Compulsory For Government Employee : गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना

The Kerala Story News : द केरळ स्टोरीच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी पुरविली सुरक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.