ETV Bharat / bharat

फादर स्टॅन स्वामींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा; एनएचआरसीकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस - कोरेगाव भीमा प्रकरण

फादर स्टॅन स्वामी यांना तुरूंगात योग्य वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळावेत, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे एनएचआरसीने रविवारी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटीसीत म्हटलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी स्वामींना अटक करण्यात आली होती. फादर स्टॅन स्वामी 84 वर्षाचे असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

फादर स्टॅन स्वामी
फादर स्टॅन स्वामी
author img

By

Published : Jul 5, 2021, 8:20 AM IST

नवी दिल्ली - फादर स्टॅन स्वामी यांच्या प्रकृतीसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) रविवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. फादर स्टॅन स्वामी यांना तुरूंगात योग्य वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळावेत, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे एनएचआरसीने रविवारी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटीसीत म्हटलं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी स्वामींना अटक करण्यात आली होती.

फादर स्टॅन स्वामी 84 वर्षाचे आहेत. एनएचआरसीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना एक नोटीस बजावली आहे. फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न करावेत, असे एनएचआरसीने जारी केलेल्या नोटीसीत म्हटले आहे. स्टॅन स्वामी यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करावे, असेही एनएचआरसीने नमुद केले आहे. तसेच नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात असलेल्या स्टॅन स्वामींच्या प्रकृती आणि उपचारासंबंधित अहवालही आयोगाने मागविला आहे.

कोरोनाच्या संक्रमणादरम्यान स्वामींना वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या नसल्याची तक्रार 16 मेला एनएचआरसीला प्राप्त झाली होती. तसेच स्वामींना अद्याप कोरोना लस दिली नसल्याचेही तक्रारीत म्हटलं होते.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक -

फादर स्टॅन हे झारखंडमधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करीत आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने नामकुम स्टेशन हद्दीत असलेल्या निवासस्थानातून फादर स्टॅन यांना ताब्यात घेतले. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. त्यांची श्रवणशक्ती कमी झाले आहे. तसेच लंबर स्पॉन्डिलायसिसमुळे ते त्रासलेले आहेत.

हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.