ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - न्यूजटुडे

देशासह राज्यातील खालील घडामोडींवर आज खास नजर असणार आहे. विविध क्षेत्रासंदर्भातल्या या सर्व घडामोडी आहेत.

newstoday 8-7-2021 etv bharat marathi
आज या घडामोडींवर असणार खास नजर
author img

By

Published : Jul 8, 2021, 7:16 AM IST

Updated : Jul 8, 2021, 8:10 AM IST

  • एकनाथ खडसे यांना ईडीने बजावले समन्स; आज हजर व्हावे लागणार
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    एकनाथ खडसे यांना ईडीने बजावले समन्स; आज हजर व्हावे लागणार

मुंबई - भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडीकडून खडसे यांना आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे इथल्या भोसरी भागातील जमीन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी एकनाथ खडसे यांना ईडीकडून एक धक्का देण्यात आला. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला.

  • नाशिक : स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सचे आज उद्घाटन
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    नाशिक : स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सचे आज उद्घाटन

नाशिकच्या बहुचर्चित वादात सापडलेल्या स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सला अखेर आजचा उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. गेल्या कित्यक दिवसांपासून हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात होता.

  • दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रश्नावर ट्विटरला उत्तर देण्याचा आज शेवटचा दिवस
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रश्नावर ट्विटरला उत्तर देण्याचा आज शेवटचा दिवस

केंद्र सरकारकडून नवीन माहिती आणि तंत्रज्ञान कायदे लागू करण्यात आले आहे. या नवीन कायद्यांतर्गत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवासी तक्रार अधिकाऱ्याची निवड करावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत ट्विटर तक्रार अधिकाऱ्याची नियु्क्ती कधी करणार आहात, हे विचारले होते. ट्विटरला याबाबत आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.

  • स्वच्छ आंध्रप्रदेश योजना आज लाँच होणार
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    स्वच्छ आंध्रप्रदेश योजना आज लाँच होणार

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डी यांचा आज जन्मदिवस आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी 'स्वच्छ आंध्रप्रदेश' ही योजना लाँच करणार आहेत.

  • एअर इंडियाच्या प्रॉपर्टीवर आज लागणार बोली
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    एअर इंडियाच्या प्रॉपर्टीवर आज लागणार बोली

मुंबई आणि दिल्लीत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एअर इंडियाच्या फ्लॅट आणि अन्य प्रॉपर्टीवर आज ई-बोली लागणार आहे. 13 लाखांपासून फ्लॅटची किंमत सुरू होणार आहे.

  • BMW R 1250 GS BS6 बाईक आज भारतात लाँच होणार
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    BMW R 1250 GS BS6 बाईक आज भारतात लाँच होणार

BMW R 1250 GS BS6 बाईक आज भारतात लाँच होणार आहे. या बाईकची किंमत 18 लाख ते 20 लाख असणार आहे, असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Royal Enfield या बाईकची प्री बुकिंग आज सुरू होणार
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    Royal Enfield या बाईकची प्री बुकिंग आज सुरू होणार

रॉयल एनफिल्ड बेनेली 502C या बाईकची प्री बुकिंग आज सुरू होणार आहे. या बाईकची किंमत पाच लाख रुपये असणार आहे.

  • अभिनेत्री नितू सिंह यांचा आज जन्मदिवस
    newstoday 8-7-2021 etv bharat marathi
    अभिनेत्री नितू सिंह यांचा आज जन्मदिवस

अभिनेत्री नितू सिंह यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 8 जुलै 1958मध्ये झाला होता. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांच्या पत्नी तसेच अभिनेता रणबीर कपूर यांच्या आई आहेत.

  • सौरव गांगुली यांचा आज जन्मदिवस
    newstoday-8-7-2021-etv-bharat-marathi
    सौरव गांगुली यांचा आज जन्मदिवस

भारताच्या महान कर्णधारांमध्ये गणना होणाऱ्या सौरव गांगुली यांचा आज वाढदिवस आहे. सध्या ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. 20 जून 1996 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केले होते. लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात गांगुलीने शतकी खेळी करुन पदार्पण साकारले. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुली यांनी 131 धावा केल्या होत्या. यासह, ते पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारे 10 वे फलंदाज ठरले. गांगुलीने 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्यांना केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे ते संघाबाहेरच राहिले. गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. ते भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जातात.

Last Updated : Jul 8, 2021, 8:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.