ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

author img

By

Published : Jul 16, 2021, 5:04 AM IST

Updated : Jul 16, 2021, 5:37 AM IST

या घडामोडींवर असणार खास नजर

newstoday-16-july-2021-etv-bharat
NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर
  • दहावीचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावरुन पाहता येईल.

  • मध्य प्रदेश विहीर दुर्घटना, बचाव कार्यावर नजर

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदाच्या लाल पठार परिसरात घडलेल्या घटनेत ४० हून अधिक जण विहिरीत पडले. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांना वाचवण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू आहे.

  • पंतप्रधान मोदी आज गुजरातमध्ये करणार विविध प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यात गुजरात सायन्स सिटी मधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीसह नेचर पार्कचा समावेश आहे. तसेच पंतप्रधान मोदी आज गांधीनगर येथे विकसित केलेल्या अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. या रेल्वे स्थानकाचा विकास ७४ कोटी रुपये खर्च करून करण्यात आला आहे.

  • राज ठाकरेंचा नाशिक दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक हा मनसेचा जुना बालेकिल्ला राहिलेला आहे.

  • किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद

भाजप नेते किरीट सोमय्या यांची आज मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयात होणाऱ्या या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या आणखी एक घोटाळ्याचा तपशील उघड करणार असल्याचे सांगितलं आहे.

  • हरियाणा आणि पाँडिचेरीमध्ये आजपासून इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू

हरियाणा सरकारने आजपासून इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ जुलैपासून ६ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पाँडिचेरीमध्ये देखील आजपासून इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

  • प्रियंका गांधी आज लखनौ दौऱ्यावर

काँग्रेस सचिव प्रियंका गांधी आज लखनौ दौऱ्यावर आहेत. त्या आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.

  • रामदास आठवले यांची पत्रकार परिषद

केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे.

  • इंग्लंड-पाकिस्तान टी-२० सामना

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्याच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिला सामना आज नॉर्टिंघममध्ये खेळला जाणार आहे.

  • दक्षिण आफ्रिका-आर्यलंड एकदिवसीय सामना

दक्षिण आफ्रिका विरुद्ध आर्यलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळला जाणार आहे.

  • झिम्बाब्वे-बांगलादेश एकदिवसीय सामना

झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सूरूवात होणार आहे. उभय संघातील पहिला सामना आज हरारे येथे रंगणार आहे.

  • मिमी चित्रपटातील परम सुंदरी गाणं आज होणार रिलीज

मिमी चित्रपटातील परम सुंदरी हे गाणे आज रिलीज होणार आहे. या चित्रपटात कृती सेनन मुख्य भूमिकेत आहे. हे गाणं श्रेया घोषालने गायले आहे. तर संगीत ए आर रहेमान यांचं आहे.

Last Updated : Jul 16, 2021, 5:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.