गॅलेक्सिया गॅलेंटे : उत्तम जेवण, डान्सिंग गाला नवेनवे ड्रिंक्स आणि खास क्लासिक सेलिब्रेशन या सर्वाचा मनसोक्त अनुभव घेण्यासाठी गॅलेक्सिया गॅलेंटेमध्ये ( Galaxia Galante ) तुम्ही पार्टीचे आयोजन करू शकता. संपूर्णपणे आपल्या तालावर चालणाऱ्या बोट क्रूझवर संपूर्ण रात्र मजेत घालवू शकता. गॅलेक्सिया गॅलेंटेमध्ये दाखल झालेले सर्वजण सर्वकाही विसरून जाणे, तिथल्या वातावरणात अवढे मिसळून जातात की तिथे असेल पर्यंत पाठी राहिलेल्या केमाचा त्यांना विसर पडतो.
टिटो क्लब : टिटो क्लब हा गोव्यातील सर्वात जुन्या क्लबपैकी एक आहे. 40 वर्षांपूर्वी टिटो क्लब ( Titos Club ) सुरू करण्यात आला होता. तिथे जोडप्यांसाठी, ग्रूपसाठी, पासेस, ऑफर्स ठेवले जातात. जोडप्याच्या प्रवेशाची किंमत रु. 2000/- ठेवण्यात आली आहे. परंतु तुम्ही त्याच दिवशी दुपारपूर्वी तिकीट खरेदी केल्यास तुम्हाला अधिक चांगली डील मिळू शकते. लवकर बुकिंग करणार्या जोडप्यांसाठी ऑफर ठेवण्यात आलेल्या आहेत. पहाटे 3 वाजेपर्यंत डीजे, पाय दुखेपर्यंत नाचणे, टिटो नाईट क्लबचे वैशिष्य आहे. परवडणाऱ्या दरात ड्रिंक्सचा मुद्दा सर्वांनाच आवडतो. हे पब खरोखरच गोव्याची जीवनशैली, आकर्षक नाइटलाइफ, ओपन बार गोव्याची खरू दुनिया दाखवतो.
क्युबाना क्लब : उत्साही गर्दी, डीजे बीट्स, प्रशस्त मैदानी पूल, रात्रभर पार्टी करणाऱ्यांसाठी क्युबाना क्लब ( Cubana Club ) सुंदर उत्तम आहे. खरोखरच एक जादुई ठिकाण असल्याचे तिथे गेलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. मोकळा श्वास, कधीही न केलेली धमाल तुम्ही अनभवू शकता. जकूझी वेळ, हिप्पी ट्रिप्पी सजावट, धमाकेदार डान्स फ्लोर, रॉकिंग कलाकार आणि त्यांचे बीट्स, या ठिकाणी सर्व काही आहे जे एखाद्याला नव्या वर्षाची सुरूवात करण्यासाठी सर्व काही मिळून देईल.
एलपीके वॉटरफ्रंट क्लब : एलपीके वॉटरफ्रंट क्लबमध्ये ( LPK Waterfront Club ) एक सुंदर वातावरण आणि सजावट आहे जी गोव्यातील संपूर्ण नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये आश्चर्यकारक चैतन्यपूर्ण रात्रीसाठी गर्दीला आकर्षित करते. नवीन वर्षाच्या सुरूवातीसाठी सगळेच उत्साही असतात. त्यामुळे या ठिकाणी वेगळाच उत्साह अनुभवता येतो. डिक्ससाठी वेगळी सोय करम्यात आली आहे. त्याव्यतिरीक्त डान्ससाठी, गेमन्स खेळण्यासाठी वेगवेगळे स्क्शन केले आहेत. त्यासाठी पुरेशी जागा आहे. उत्तम प्रकारचे खाद्य तेही अमर्याद, पेये अमर्यादित आहेत