ETV Bharat / bharat

Delhi Kanjhawala Case : अपघाताच्या दिवशी अंजली आणि निधी एकत्र घरातून निघाल्या होत्या, सीसीटीव्ही फुटेज आले बाहेर - अंजली आणि निधी

दिल्ली कांजवाला प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (cctv footage in delhi kanjhawala case). यामध्ये अंजली आणि निधी दोघी दिल्लीतील किरारी येथील अंजलीच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. पोलिसांनी याला दुजोरा दिला नसला तरी तपास सुरू केला आहे. (kanjhawala hit and run case).

cctv footage in delhi kanjhawala case
कांजवाला घटनेतील सीसीटीव्ही फुटेज
author img

By

Published : Jan 6, 2023, 9:05 PM IST

कांजवाला घटनेतील सीसीटीव्ही फुटेज

नवी दिल्ली : दिल्लीतील कांजवाला प्रकरण (kanjhawala hit and run case) गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या प्रकरणात प्रत्येक क्षणाला रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुन्हा एकदा कांजवाला घटनेतील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (cctv footage in delhi kanjhawala case). हे सीसीटीव्ही फुटेज पीडित अंजलीच्या किरारी येथील घरातील असल्याचे सांगितले जात आहे. फुटेजनुसार, अंजली आणि निधी अंजलीच्या घरातून एकत्र बाहेर पडताना दिसत आहेत. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, ह्या दोघी किरारीतून बाहेर पडतात तेव्हा अंजली स्कूटी चालवत आहे.

पोलिसांचा तपास चालू : हा व्हिडिओ 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 7.10 मिनिटांचा आहे. त्या दोघीही तेथून निघून मंगाराम पार्क येथील हॉटेलमध्ये पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घरातून बाहेर पडणे आणि हॉटेल गाठणे यातील वेळेबाबत अजूनही विरोधाभास आहे. या व्हिडीओचे खरे सत्य काय आहे हे पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे. अजूनही या प्रकरणी तपास चालू आहे आणि आत्तापर्यंत याच्या अधिकृत पुष्टीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या आधीही एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले : यापूर्वी गुरुवारीही या प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या फुटेजमध्ये आरोपी आणि त्याची कार स्पष्ट दिसत होती. यासोबतच आरोपी फुटेजमध्ये कारमधून खाली उतरतानाही दिसत होते. हे फुटेज अपघातानंतरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. फुटेजमध्ये आरोपी कारमधून कसे खाली उतरतात, त्यानंतर कार चालक त्याला कसा घेऊन जातो हे दिसत आहे. सध्या पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

अंजलीचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू : पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये अंजलीने दारू प्यायली नसल्याची पुष्टी झाली आहे. यासोबत बलात्कारासारख्या घटनेची चर्चा नाही. अंजलीच्या शरीरावर 40 ठिकाणी खोल जखमांच्या खुणा असल्याचेही अहवालात समोर आले आहे. पाठ पूर्णपणे सोललेली होती. निधीच्या शेजारच्या मुलाने सांगितले की, 1 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता निधी फोन चार्जिंगसाठी त्यांच्या घरी आली होती आणि नंतर पुन्हा फोन घेऊन निघून गेली. रिपोर्टनुसार, जास्त रक्तस्त्राव झाल्याने अंजलीचा मृत्यू झाला. अहवालात दोन्ही पाय, डोके, पाठीचा कणा आणि डाव्या मांडीच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याने रक्त वेगाने वाहत होते. अंजलीला झालेल्या सर्व दुखापती कार अपघातामुळे आणि कारखाली फरफटल्याने झाल्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.