यमुनानगर - जिल्ह्यात छछरौली ठाणे परीसरात नेपाळी वंशाच्या महिलेवर ५ लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने या प्रकरणी छछरौली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पुढील तपासाची सुत्र हाती घेतली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडितेच्या पतीने सांगितले की, घटनेवेळी आरोपींनी त्यांना चारपाईला बांधले होते. या आरोपीनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या पतीचा जबाब नोंदवला आहे.
ही महिला १४ वर्षा पासून पती सोबत यमुनानगर परिसरात राहत होती. घटनेच्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास जेवन करून महिला व त्यांचे कुटुंबीय बसले होते. यावेळी पाच आरोपी कार मधुन आले. त्यांनी महीलेवर चारपाईला बांधुन अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.