नवी दिल्ली: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आजपासून चार दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. दहल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते 31 मे ते 3 जून या कालावधीत भारतात विविध नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान नेपाळचे पंतप्रधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचीदेखील भेट घेणार आहेत.
नेपाळचे पंतप्रधान आज दुपारी 2.50 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. पंतप्रधान दहल दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी 10.30 वाजता महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबत सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये बैठकीत चर्चा करणार आहेत.
नेपाळचे पंतप्रधान या नेत्यांच्या घेणार भेटी- दोन्ही देशांमध्ये विविध करार करण्यात येणार आहेत. या करार व विविध चर्चेबाबतची माहिती दोन्ही पंतप्रधानांकडून दुपारच्या सुमारास देण्यात येणार आहे. नेपाळचे पंतप्रधान उपराष्ट्रपती दुपारी ४ वाजता जगदीप धनखर यांची मौलाना आझाद रोडवरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतील. यानंतर दहल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, त्यांच्या अधिकृत कार्यक्रमांव्यतिरिक्त, दहल एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इंदूरला रवाना होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार ते उज्जैनलाही जाण्याची शक्यता आहे.
संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न- नेपाळचे पंतप्रधान दहल हे शनिवार, 3 जून रोजी दुपारी 4.20 वाजता ते काठमांडूला रवाना होणार आहेत. नेपाळचे पंतप्रधान दहल यांच्या दौऱ्यात एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान दहल हे भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय भागीदारीच्या विविध क्षेत्रांवर पंतप्रधान मोदींसोबत सविस्तर चर्चाही करणार आहेत. पूर्वीपासून नेपाळ आणि भारताचे संबंध चांगले राहिले आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भारताकडून नेपाळला सातत्याने पायाभूत सुविधा, संरक्षण व तंत्रज्ञान आदी सेवांमध्ये मदत करण्यात येते. मात्र, चीनसोबत जवळीक झाल्यानंतर काहीकाळ भारत व चीनचे संबंध ताणले होते.
हेही वाचा-