ETV Bharat / bharat

Nepal Plane Crash : नेपाळ विमान दुर्घटनेत पर्यटनासाठी गेलेल्या उत्तर प्रदेशच्या पाचही जणांचा मृत्यू - आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्यातरी बंद

यती एअरलाईन्सचे विमान काठमांडूहून पोखराला जात असताना त्याचा अपघात झाला. विमानात 68 प्रवासी होते. त्यापैकी पाच भारतीय होते. हे सर्व पर्यटनासाठी गेले होते. घटनेचा तपास सध्या काठमांडू पोलिसांकडून सुरू आहे.

Plane Crashed in Nepal
उत्तर प्रदेशच्या पाचही जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 16, 2023, 8:50 AM IST

Updated : Jan 16, 2023, 9:31 AM IST

उत्तर प्रदेशच्या पाचही जणांचा मृत्यू

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी मोठी दुर्घटना घडली. ७२ आसनी प्रवासी विमान कोसळून मोठी जिवीतहानी झाली आहे. यती एअरलाइन्सच्या विमानात क्रू मेंबर्ससह ६८ प्रवासी होते. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये पाच भारतीयांचाही समावेश आहे, त्यापैकी चार उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे रहिवासी होते.

Nepal Plane Crash
नेपाळ विमान दुर्घटनेत मृत्यू

मृतांची नावे : नेपाळ विमान अपघातात गाझीपूर येथील अनिल राजभर, रामदरस राजभर ( राहणारे चकजैनाब, जहुराबाद ) , सोनू जैस्वाल राजेंद्र जैस्वाल ( वय वर्ष 30 राहणारे जकजैनब, जहुराबाद ), अभिषेक कुशवाह (वय वर्ष २२ राहणारे धारवा कला), विशाल शर्मा, संतोष शर्मा ( वय 25 अलवलपूरचे रहिवासी ), संजय जैस्वाल यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

Nepal Plane Crash
नेपाळ विमान दुर्घटनेत मृत्यू

चौघेही तरुण : गाझीपूरचे डीएम आर्यका अखोरी यांनी सांगितले की, चौघेही तरुण होते आणि जवळचे मित्र होते. चौघेही नेपाळला भेट देण्यासाठी गेले होते. अपघाताची माहिती चार तरुणांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. काठमांडूहून नेपाळमधील पोखरा येथे जाणारे यति एअरलाइन्सचे एटीआर-२७ हे विमान रविवारी सकाळी पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. 72 आसनी असलेल्या यति एअरलाइन्सच्या ATR-27 विमानात 68 प्रवासी होते. तर चार क्रू मेंबर होते. मृतांमध्ये पाच जण उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी होते.

आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्यातरी बंद : पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्यातरी बंद करण्यात आल्याची माहिती नेपाळच्या माध्यमांकडून मिळाली आहे. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, यती एअरलाइन्सच्या एटीआर-२७ या विमानात पाच भारतीय प्रवासी होते. भारतीय दूतावासाने या घटनेत बळी पडलेल्या पाच भारतीयांच्या कुटुंबांव्यतिरिक्त इतर लोकांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन जारी केली आहे. काठमांडूमध्ये दिवाकर शर्मा यांच्याशी फोन नंबर +977-9851107021 आणि पोखरामध्ये लेफ्टनंट कर्नल शशांक त्रिपाठी यांच्याशी फोन नंबर +977-9856037699 वर संपर्क साधता येईल. भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : Big plane crashes in Nepal: नेपाळमध्ये नेहमीच होतात विमान अपघात.. १० वर्षात १२५ हुन अधिक जणांचा मृत्यू

Last Updated : Jan 16, 2023, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.