दिल्ली - नेपाळ सरकारने ( ( Nepal Government ) आयआरसीटीसीच्या ( IRCTC ) भारत गौरव पर्यटन रेल्वेला आपल्या देशातून मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली आहे. प्रभू रामांच्या स्थळांशी निगडित विविध ठिकाणांवरून ही रेल्वे धावेल. यामध्ये धनुषा पहाड, बावन बिघा क्षेत्र, माता जानकी जन्मस्थळ मंदिर आणि श्री राम विवाह स्थळ या भागातून ही रेल्वे जाईल.
नेपाळसाठीही सन्मानाची बाब - नेपाळ सरकारने आपल्या पत्रात म्हटले आहे की, नेपाळच्या विदेश मंत्रालयास प्रभू रामांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख तिर्थस्थळांसाठी भारतातून नेपाळला 23 जून ला भारत गौरव रेल्वेला येऊ देण्याचा सन्मान मिळाला आहे. पहिली भारत गौरव पर्यटक रेल्वे राजधानी दिल्ली येथून 21 जूनला श्री रामायण यात्रेसाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे 8 हजार अंतर धावणार असून भगवान रामांशी संबंधित विविध ठिकाणांवर भारतीय पर्यटकांना नेणार आहे.
हेही वाचा - MP Navneet Rana :'...तर आम्ही काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करु'