ETV Bharat / bharat

Nehru Memorial Renamed : मोदी सरकारने दिल्लीतील नेहरू वस्तुसंग्रहालयाचे बदलले नाव, 'ही' असणार नवी ओळख - दिल्लीतील तीन मूर्ती भवन

दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलून आता पंतप्रधान संग्रहालय ( Prime Minister Museum And Library ) ठेवण्यात आले आहे. नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जून महिन्यात दिला होता. त्यानंतर एनएमएमएलच्या समितीने 14 ऑगस्टला नाव बदलण्यात आल्याची माहिती ट्विटरवर दिली.

Nehru Memorial Renamed
दिल्लीतील नेहरू मेमोरियलचे नाव बदलले
author img

By

Published : Aug 16, 2023, 10:33 AM IST

नवी दिल्ली : भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून देशातील अनेक शहरे, वास्तू आणि रस्त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. आता दिल्लीतील नेहरू मेमोरियलचे नावही मोदी सरकारने बदलले आहे. नेहरू मेमोरियलचे आता पंतप्रधान संग्रहालय ( Prime Minister Museum And Library ) असे नामकरण करण्यात आले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव एनएमएमएलच्या समितीने 17 जून 2023 ला दिला होता. मात्र 14 ऑगस्ट 2023 पासून हे नाव बदलण्यात आल्याची माहिती संग्रहालयाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जूनमध्ये घेतला होता नाव बदलण्याचा निर्णय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव 2016 मध्ये ठेवला होता. त्यामुळे एनएमएमएलच्या सोसायटीने जूनमध्ये नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एनएमएमएलच्या सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी याबाबतचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव पदावर कार्यरत होते.

  • Delhi | Nehru Memorial Museum and Library (NMML) officially renamed as the Prime Ministers’ Museum and Library (PMML) Society with effect from 14th August.

    Visuals from outside PMML. pic.twitter.com/wZ3vN1LBJd

    — ANI (@ANI) August 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंडित नेहरुंचे 16 वर्षे या वास्तूत निवास्थान : दिल्लीतील तीन मूर्ती भवन हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या वास्तूत तब्बल 16 वर्षे वास्तव्य केले होते. त्यानंतर त्यामुळे राष्ट्रपती एस राधाकृष्णन यांच्या हस्ते ही वास्तू नेहरू यांना समर्पित करण्यात आली होती. तेव्हापासून या वास्तूला नेहरू मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जात होते.

पंतप्रधान संग्रहालय जनतेसाठी खुले : एनएमएमएल समितीच्या उपाध्यक्षांनी 14 ऑगस्टला या संग्रहालयाचे नाव बदलण्यात आल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आल्याचेही आपल्या ट्विमध्ये नमूद करुन नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसची जहरी टीका : पंडित नेहरू यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तूचे नाव बदलल्यामुळे काँग्रेसने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली होती. काँग्रेस नेते आणि पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयराम रमेश यांनीही सुडाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. पंडित नेहरू यांचा वारसा नष्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात, अशी टीकाही काँग्रेस नेत्यांनी केली होती.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.