ETV Bharat / bharat

पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांना पदावरून काढावे- राष्ट्रीय महिला आयोगाची सोनिया गांधींना विनंती - कॅप्टन अमरिंदरसिंग राजीनामा

पंजाबमधील राजकारणाचे वादळ शमते न शमते तोवरच त्यांच्या पदाला आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजित सिंग यांच्या हटविण्याची सोनिया गांधींकडे विनंती केली आहे. यावर काँग्रेसच्या हायकमांड काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रेखा शर्मा
रेखा शर्मा
author img

By

Published : Sep 20, 2021, 5:06 PM IST

नवी दिल्ली- दलित नेते चरणजित सिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने निशाणा साधला आहे. चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे, अशी सोनिया गांधींना विनंती असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, की चरणजित सिंग हे महिला अध्यक्ष असलेल्या पक्षामुळे पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकले आहे. हा बदला आहे. ते महिलांच्या सुरक्षेला धोका आहे. त्यांच्याविरोधात चौकशी करायला हवी. ते मुख्यमंत्री म्हणून पात्र नाहीत. त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे, अशी सोनिया गांधींना विनंती आहे.

हेही वाचा-दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पंजाब महिला आयोगानेही तक्रारीची घेतली होती दखल-

मी टूची 2018 मध्ये मोहीम सुरू असताना चरणजित सिंग यांच्याविरोधातही दावे करण्यात आले होते. राज्य महिला आयोगानेही सू मोटाने प्रकरणाची दखल घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धरणे आंदोलन करत त्यांना काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, तसे घडले नाही, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-दिव्यांगांकरिता घरोघरी लसीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

मुख्यमंत्रीपदाची सोमवारी घेतली शपथ

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर आमदार चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी लागली आहे. कॅबिनेट मंत्री और तीन वेळा आमदार असलेले चन्नी हे सोमवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. चन्नी हे पंजाबमधील पहिले दलित नेते आहेत, ज्यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी चन्नी यांची काँग्रेसचे गट नेते म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली.

हेही वाचा-गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 9,000 कोटींचे हेरॉइन जप्त, गुप्तचर विभागाची सर्वात मोठी कारवाई

काँग्रेसच्या नेत्याने चरणजित सिंग यांचे केले अभिनंदन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग, मनीष तिवारी आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी चन्नीचे अभिनंदन केले. अमरिंदर सिंग यांनी आशा व्यक्त केली की, ते सीमावर्ती पंजाब आणि लोकांचे संरक्षण करू शकतील. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, नवीन जबाबदारीसाठी चरणजीत सिंग चन्नी जी यांचे अभिनंदन. आपल्याला पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे सुरू ठेवावे लागेल. विश्वास सर्वात महत्वाचा आहे, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, अशी चर्चा होती, मात्र काँग्रेस हायकमांडने चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.