नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या ट्विटरवर कारवाईची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आता गांधींच्या इन्स्टाग्राम अकाउंटकडे मोर्चा वळविला आहे. एनसीपीसीआरने राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याने ही कारवाई करावी, असे एनसीपीसीआरने फेसबुकला पत्र लिहिले आहे.
राहुल गांधींच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईलवर काय कारवाई केली, याची माहिती कंपनीच्या व्यक्तीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे द्यावे, एनसीपीसीआरने फेसबुकला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांच्या हक्काविषयी काम करणाऱ्या संस्थेने राहुल गांधींच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा-ट्विटर अकाउंट पुर्ववत होताच राहुल गांधींचे ट्विट, म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, की आमचे राजकारण निश्चित करून ट्विटर कंपनी व्यवसाय करत आहे. राजकारणी म्हणून मला हे आवडत नाही. हा भारताच्या लोकशाही संरचनेवरील हल्ला आहे. हा राहुल गांधींवरील हल्ला नाही. त्यावर ट्विटरने कायदेशीर नियमांच्या अधीन राहून कारवाई केल्याचे म्हटले आहे. ट्विटरची सेवा घेणाऱ्यांवर हे नियम बंधनकारक असल्याचेही ट्विटरने स्पष्ट केले.
हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने ठोठावले दार?, लहान मुलांना संसर्ग
ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले, की जर नियमांचे उल्लंघन झाले तर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच ठेवणार आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो ट्विट फोटोवर यापूर्वी आम्ही कारवाई केली आहे. काही खासगी माहिती ही इतरांच्या तुलनेत धोकादायक असते. प्रत्येकाची गोपनीयता आणि सुरक्षेचे संरक्षण करण्याचे आमचे ध्येय आहे. ट्विटरचे नियम आणि नियमांचे उल्लंघन होऊ शकणाऱ्या बाबी याबाबत आमच्या सेवा चांगल्या परिचित करून घ्या, यासाठी आम्ही प्रत्येकाला प्रोत्साहन देत आहोत.
हेही वाचा-गोव्याच्या सांत जासिंतो बेटावरील कृत्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला निषेध
पीडितेची ओळख उघड केल्याने ट्विटरने राहुल गांधींच्या ट्विटरवर अकाउंटवर केली होती कारवाई
6 ऑगस्टला ट्विटरने राहुल गांधींचे ट्विट काढले होते. कारण, त्यांनी दिल्लीमधील बलात्कार पीडितेची ओळख जाहीर केली होती. ही पीडिता अल्पवयीन होती. पोक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
काय घडली होती घटना?
काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील जुना नांगल येथे स्मशान घाटावर 9 वर्षांची मुलगी वॉटर कुलरचे पाणी पिण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो राहुल गांधी यांनी ट्विट केला होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे ट्विट काढण्याचे 4 ऑगस्टला आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट काही काळापुरते स्थगित करण्यात आले होते. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.