ETV Bharat / bharat

Maoists killed : सुरक्षा दलांना मोठे यश.. एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांचा केला खात्मा - पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी

विजापूरमधील मिर्तूरच्या पोमरा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई सुरू आहे.( Maoists killed in encounter with security forces )

Maoists killed
तीन नक्षलवादी ठार
author img

By

Published : Nov 26, 2022, 11:52 AM IST

कर्नाटक : विजापूरमधील मिर्तूरच्या पोमरा जंगलात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 40 हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. सकाळी 7.30 वाजता ही चकमक झाली. या चकमकीत एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. डीआरजी, एसटीएफ आणि केरिपू दलाच्या संयुक्त कारवाईला मोठे यश मिळाले असून शोध मोहीम सुरू आहे. ( Maoists killed in encounter with security forces )

पोमरा जंगलात झाली चकमक : बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले असताना सकाळी साडेसातच्या सुमारास मिर्तूर पोलीस ठाण्याच्या पोमरा जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) ), स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे जवान सामील झाले. विभागीय समितीचा सदस्य असलेला नक्षलवादी मोहन कडती आणि सुमित्रा हे दोघे जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी कारवाई केली.

सुरक्षादलांचे पथक जंगलात गेल्यावर झाली चकमक : बस्तर रेंजचे आयजी म्हणाले की, राजधानी रायपूरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या पोमारा जंगलात 30-40 नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा DRG चे पथक पोमराच्या जंगलात गस्त घालत होते तेव्हा चकमक सुरू झाली. गोळीबार थांबल्यानंतर, मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.