ETV Bharat / bharat

त्रिशूळ पर्वतावर हिमस्खलन: नौदलाचे पाच जवान बेपत्ता, रेस्क्यू सुरू - हिमस्खलनात सहा जवान बेपत्ता,

राज्यातील त्रिशूळ या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी गेलेल्या नौदलाच्या संघावर हिमस्खलन झाले आहे. यामध्ये दहा जवान अडकले होते. त्यापैकी पाच जवानांना रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर अद्याप पाच जवान हे बेपत्ता झाल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पर्वतावर चढाई करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

Avalanche on Trishul Mountain: Six Navy personnel go missing
त्रिशूळ पर्वतावर हिमस्खलन: नौदलाचे पाच जवान बेपत्ता, रेस्क्यू सुरू
author img

By

Published : Oct 1, 2021, 6:20 PM IST

Updated : Oct 1, 2021, 7:49 PM IST

चमोली (उत्तराखंड) - राज्यातील त्रिशूळ या पर्वतावर गिर्यारोहण करण्यासाठी गेलेल्या नौदलाच्या संघावर हिमस्खलन झाले आहे. यामध्ये दहा जवान अडकले होते. त्यापैकी पाच जवानांना रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर अद्याप पाच जवान हे बेपत्ता झाल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पर्वतावर चढाई करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

त्रिशूळ पर्वतावर हिमस्खलन: नौदलाचे पाच जवान बेपत्ता

दोन हप्तापूर्वी निघाले होते मोहिमेवर -

माउंट त्रिशूल या पर्वताचे गिर्यारोहण करण्यासाठी घाटाच्या क्षेत्रातून निघाले होते. नेहरू पर्वतारोहण संस्थेचे कर्नल अमित बिष्ट यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास हिमस्खलनाची घटना घडली. यामध्ये 10 जवान अडकले होते. त्यातील पाच जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

हेलीकॉप्टरच्या साह्याने शोधकार्य सुरू -

नौसेनेच्या दलाचे जवान 15 दिवसांपूर्वी 7,120 मीटर उंच असलेल्या त्रिशूल शिखराचे गिर्यारोहण करण्याच्या मोहिमेसाठी निघाले होते. शुक्रवारी सकाळी जवान शिखरावरती चढण्यासाठी निघाले होते. तेव्हा हिमस्खलन झाले. या हिमस्खलनामध्ये नौसेने जवान अडकले. या घटनेची माहिती मिळताच, उत्तरकाशी येथून हेलीकॉप्टरच्या साह्याने येथील पथक हे बेपत्ता झालेल्या जवानांच्या शोधात निघाली होती.

अद्याप 5 जवान बेपत्ता -

या 20 सदस्यीय जवानांच्या अभियानाला 3 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. 10 गिर्यारोहकांनी आज (शुक्रवार) सकाळी शिखराची चढाई सुरू केली होती. मात्र, शिखरावर पोहोचण्या अगोदरच ते हिमस्खलनात अडकले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 10 गिर्यारोहक जवानांपैकी 5 गिर्यारोहक जवान हे सुरक्षित आहेत, तर 5 जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे.

हेही वाचा - बस-कंटेनरचा भीषण अपघात, ७ प्रवासी जागीच ठार, १३ जखमी

Last Updated : Oct 1, 2021, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.