नवरात्रोत्सव ( Navratri Festival ) देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. काही लोक नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करतात. उपवास करताना खिचडी, वरईचा भात हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून ( Sabudana Recipes ) तयार करण्यात आलेले हे टेस्टी पदार्थ तुम्ही ट्राय करु शकता. ( Navratri Recipe 2022 Know Sabudana Recipes In Marathi )
साबुदाण्याचा डोसा - प्रथम साबुदाणा धुवा. त्यानंतर साबुदाणा 4 तास भिजत घालावा तर भगर अर्धा तास भिजवून घ्यावी. मिक्सरमध्ये साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटावे. या मिश्रणामध्ये मीठ घाला. हे मिश्रण तव्यावर टाकून याचा डोसा तयार करा.
साबुदाण्याचे थालिपीठ - ज्याप्रमाणे आपण साबुदाणा वड्यासाठी मिश्रण तयार करतो त्याच प्रमाणे साबुदाणा थालिपीठसाठी मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे थालिपीठ तयार करा. हे थालिपीठ तव्यावर भाजून घ्या. साबुदाण्याचे थालिपीठ हे टेस्टी लागते तसेच हे तयार करताना तेलाचा वापर देखील जास्त केला जात नाही. त्यामुळे हे थालिपीठ हेल्दी आहे.
साबुदाणा वडा - साबुदाणा वडा ही अनेकांचा आवडता पदार्थ आहे. यामध्ये भिजवलेल्या साबुदाण्यात भाजलेले शेंगदाणे, तिखट हे सगळे मिक्स करुन याचे छोटे वडे तयार करुन ते गरम तेलात तळले जातात. साबुदाणा वडा हा तुम्ही दह्यासोबत किंवा ताकासोबत खाऊ शकता.
साबुदाणा टिक्का - भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये हिरवी मिर्ची, लाल तिखट, शेंगदाण्याचे कूट इत्यादी मिक्स करुन टिक्की तयार करा ही टिक्की तव्यावर शॅलो फ्राय करा. दह्यासोबत तुम्ही ही टेस्टी टिक्की खाऊ शकता.
साबुदाण्याची खीर - उपवास करताना तिखट पदार्थ खाल्यानं अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शाबुदाण्यापासून तयार करण्यात आलेली खीर तुम्ही खाऊ शकता. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी साबुदाणा, दूध, साखर, केसर इत्यादी साहित्य लागते. अगदी सोप्या पद्धतीनं तयार करण्यात येणारा हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता. खीर तयार झाल्यावर तुम्ही त्यावर ड्राय फ्रुट्स आणि इलायची पाउडर तुम्ही टाकू शकता.