ETV Bharat / bharat

Navratri Recipe 2022 : या नवरात्रीमध्ये तयार करा खुसखुशीत कडाकणी; जाणून घ्या रेसिपी मराठीत - Navratri Culture

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या ९ रूपांचीही पूजा ( Navratri Puja ) केली जाते. मातेची ही ९ रूपे 'नवदुर्गा' म्हणून ओळखली जातात. नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकणी ( Kadakani ) नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. तर खुसखुशीत कडाकणी ( Crispy Kadakani ) कशा तयार करायच्या ते पाहूयात. ( Navratri 2022 Navratri Recipe Know How To Make Kadakani )

Kadakani
खुसखुशीत कडाकणे
author img

By

Published : Sep 17, 2022, 2:06 PM IST

Updated : Sep 17, 2022, 3:23 PM IST

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या ९ रूपांचीही पूजा ( Navratri Puja ) केली जाते. मातेची ही ९ रूपे 'नवदुर्गा' म्हणून ओळखली जातात. नवरात्रीचे ९ दिवस उपवास केल्यानंतर आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते. नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकणीचा ( Kadakani ) नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. कडाकणीचा ( Crispy Kadakani ) माळ तयार करुन ती माळ काही लोक घटाला देखील बांधतात. तर जाणून घेऊयात या चविष्ट कडाकणी तयार करण्याची सोपी पद्धत.( Navratri 2022 Navratri Recipe Know How To Make Kadakani )

Make Kadakani In Marathi
या नवरात्रीमध्ये तयार करा खुसखुशीत कडाकणी
  • लागणारे साहित्य -

1. पाव किलो मैदा

2. पाव वाटी रवा

3. 125 ग्रॅम साखर

4. पाव वाटी तूप

3. चविप्रमाणे मीठ

4. तळणीसाठी तेल

  • कृती -

सर्वप्रथम साखरेची पिठीसाखर तयार करा. त्यानंतर परातीत चाळलेला मैदा घ्या त्यामध्ये बारिक रवा आणि थोडसं मीठ घाला. त्यामध्ये गरम केलेल्या तूपाचे मोहन घाला. हे मिश्रण मिक्स करुन घ्या. त्यानंतर पिठी साखरेमध्ये पाव वाटी पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण पिठाच्या मिश्रणात घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून हे सर्व मिश्रण मळून त्याचा एक गोळा तयार करा. दोन तास हा गोळा झाकून घ्या.

त्यानंतर झाकलेला हा गोळा फूड प्रोसेसरमध्ये घालून मिक्स करा किंवा हाताने मळून घ्या. त्यामुळे हा पिठाचा गोळा मऊ होतो. या गोळ्याचे लहान अकाराचे गोळे तयार करुन ते गोळे पुरी प्रमाणे लाटा. लाटताना तुम्ही गोळ्याला मैद्याचं पिठ लावू शकता. त्यामुळे गोळा लाटण्याला चिटकणार नाही.

लाटलेल्या कडकण्या एका सूती कापडावर ठेवा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करुन घ्या. गरम तेलामध्ये लाटलेल्या कडकण्या टाका. कडकण्या या बाहेरील बाजूने लाल झाल्या की लगेच तेलातून काढा. त्यामुळे कडकण्या तेलकट होत नाहीत आणि खुसखुशीत होतात. कुरकुरीत कडाकणी करायच्या असतील तर लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळा.

Last Updated : Sep 17, 2022, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.