ETV Bharat / bharat

नवज्योत सिंग सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; अमरिंदर सिंग यांनी लगावला टोला

author img

By

Published : Sep 28, 2021, 3:30 PM IST

Updated : Sep 28, 2021, 4:13 PM IST

नवज्योत सिंग यांनी अचानकपणे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये काय राजकीय हालचाली होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu

चंदीगड- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग हे दिल्ली यांची मुख्यमंत्री पदावरून विकेट काढल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचे पंजाबच्या राजकारणात पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अचानक नवज्योत सिंग यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग यांना टोला लगावला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की राजीनामा दिला असला तरी काँग्रेससाठी काम सुरुच ठेवणार आहे. नवज्योत सिंह यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की मी पक्षात राहून तडजोड करत असल्याचे मला वाटत आहे. अजेंड्याच्या मदतीने पंजाबचे भविष्य पाहत आहे. त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

नवज्योत सिंग यांचे ट्विट
नवज्योत सिंग यांचे ट्विट

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की तुम्हाला मी सांगितले होते, की तो अस्थिर माणूस आहे. ते सीमेवर असलेल्या पंजाब राज्यासाठी योग्य नाही.

  • I told you so…he is not a stable man and not fit for the border state of punjab.

    — Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संबंधित बातमी वाचा-पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...

यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी ही केली होती सिद्धू यांच्यावर टीका

राजीनामा दिल्यानंतरही अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर केली होती टीका-

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, की नवज्योत सिंग सिद्धू हा अकार्यक्षम माणूस आहे. ते मोठे संकट होणार आहेत. पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला विरोध असणार आहे. त्यांचे पाकिस्तानबरोबर संबंध आहेत. नवज्योत सिंग हे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असणार आहेत. सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान व पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे मित्र आहेत. मी माझ्या देशासाठी पंजाबचे मुख्यमंत्री पदाकरिता नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाला विरोध करणार आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. आमदार नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात दुफळी निर्माण झाली. यापूर्वी दोघांदरम्यान पोस्टर्स वॉरदेखील रंगले होते.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीच्या दौऱ्यावर-

पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजकीय हालचालींबाबत विविध अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. अशातच अमरिंदर सिंग हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सूत्राने सांगितले. काँग्रेसमध्ये नवज्योत सिंग सिद्धूबरोबर टोकाचे मतभेद झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबरला संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा दिला होता. मुख्यंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. तेव्हा अमरिंदर सिंग म्हणाले होते, की मी स्वत:ला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. त्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातमी वाचा-नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींची भेट

पंजाबमधील राजकीय समीकरण -

पंजाब विधानसभा निवडणूक 2017 साली पार पडली होती. यावेळी 117 जागांसाठी मतदान पार पडले. 11 मार्च 2017 रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजपा युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल व भाजपाची युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळं पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी वाचा-सिद्धूंना मुख्यमंत्री पदापासून रोखण्याकरिता कोणताही त्याग करण्यास तयार- अमरिंदर सिंग

Last Updated : Sep 28, 2021, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.