चंदीगड - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सिद्धू शिवाय आणखी चार कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती देखील सोनिया गांधी यांनी केली आहे. या संदर्भात काँग्रेसकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सोनिया गांधींच्या आदेशनुसार पंजाब काँग्रेस समितीवर सिद्धू शिवाय चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले. यामध्ये संगतसिंग गिलजियां, सुखविंदरसिंग डैनी, पवन गोयल आणि कुलजीतसिंग नागरा यांचा समावेश आहे. सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेणार आहेत.
काँग्रसेकडून एक पत्रक काढण्यात आले असून यावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची स्वाक्षरी आहे. यात आतापर्यंत पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनील जाखड यांच्या योगदानाची पक्ष प्रशंसा करतो आहे. असे वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. याचसोबत, कुलजीतसिंग नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त देखील करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमिवर शुक्रवारी सिद्धू यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.
हेही वाचा - व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट
हेही वाचा - पोटाच्या ऑपरेशनकरिता केली बचत, उंदरांनी कुरतडल्या 2 लाखांच्या नोटा