ETV Bharat / bharat

National Science Day 2023 : राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या सी व्ही रामन यांच्या संशोधनाविषयी! - भौतिकशास्त्राचे थोर शास्त्राज्ञ सी व्ही रामन

भौतिकशास्त्राचे थोर शास्त्राज्ञ सी व्ही रामन यांनी १९२८ ला रामन इफेक्टचा शोध लावला. त्यामुळे सी व्ही रामन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार १९३० ला मिळाला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

National Science Day 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 22, 2023, 11:48 AM IST

Updated : Feb 28, 2023, 7:48 AM IST

मुंबई : देशभरात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. मात्र सी. व्ही. रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९८८ ला झाला आहे. तर त्यांना भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार १९३० ला मिळाला आहे. मात्र तरीही विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीला का साजरा करण्यात येतो, याबाबतची माहिती तुम्हाला आम्ही या लेखातून देणार आहोत.

२८ फेब्रुवारीला का साजरा केला जातो विज्ञान दिवस : थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी भौतिक शास्त्रात विविध शोध लावले आहेत. त्यामुळे त्यांनी जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक केला आहे. सी व्ही रामन यांचा जन्म तिरूचिल्लापल्ली येथे ७ नोव्हेंबर १९८८ ला झाला होता. सी व्ही रमन यांनी केलेल्या थोर कार्यामुळेच त्यांना १९३० ला भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी सी व्ही रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. या शोधासाठीच प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही रामन यांना भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी १९८७ ला पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.

कोण होते सी व्ही रमन : सी व्ही रामन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. त्यांचा जन्म तिरूचिल्लापल्ली येथील सामान्य कुटूंबात ७ नोव्हेंबर १९८८ ला झाला होता. त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले होते. त्यांनी कोलकात्ता विद्यापीठात १९१७ ते १९३३ या कालावधीत भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले आहे. सी व्ही रामन हे १९४७ मध्ये रमन संशोधन संस्थेचे संचालक झाले. त्यानंतर त्यांच्या संस्थेने विविध संशोधन केल्याचे पुढे जगविख्यात आहे.

सी व्ही रमन यांच्या संशोधनाची कशी झाली सुरुवात : भौतिक शास्त्रज्ञ सी व्ही रामन हे १९१७ मध्ये कोलकात्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले होते. त्यानंतर त्यांना युरोप दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच युरोप दौऱ्यात त्यांना भूमध्य समुद्र पाहून त्यांना पाण्याचा रंग निळा कसा याबाबतचे अनेक प्रश्न पडले. त्यामुळे त्यांनी याबाबत त्यांनी जॉन विल्यम रैले यांच्या तर्काबाबत संशोधन केले. आकाशाच्या प्रतिबिंबामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग निळा दिसतो असा विल्यम यांचा तर्क असल्याचे त्यांना समजले. मात्र आकाश तर राखाडी रंगाचे दिसते, मग पाणी राखाडी रंगाचे का दिसत नाही ? असा प्रश्न सी व्ही रामन यांना पडला. त्यामुळे जॉन विल्यम यांच्या मताशी सहमत रामन हे सहमत झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी याबाबत संशोधन सुरू केले.

असा लागला रामन इफेक्टचा शोध : युरोप दौऱ्यावरुन परतल्यानंतर सीव्ही रामन यांनी १९२३ साली काही उपकरणांसह पाणी आणि प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास सुरू केला. अथांग समुद्राच्या निळाईचे कारण हे प्रकाशाच्या पाण्याच्या रेणुंमुळे होणारे विकिरण असल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यानंतर सी व्ही रामन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगामध्ये परावर्तीत होण्याबाबतचे संशोधन केले. या संशोधनातून ते ज्या निष्कर्षावर पोहोचले तो 'रामन इफेक्ट' म्हणून जगात सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे सी व्ही रामन यांनी १९२८ साली रामन इफेक्टचा शोध लागला. या शोधासाठी सी व्ही रामन यांना १९३० सालचा भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला. रामन यांच्या विज्ञानातील या भरीव कामगिरीमुळे २८ फ्रेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

हेही वाचा - 6G Network : या देशात 6G तंत्रज्ञानाला चालना देण्यास भर, 6G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी वेळ सीमा निश्चित

Last Updated : Feb 28, 2023, 7:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.