ETV Bharat / bharat

National Engineers Day 2023 : जाणून घ्या कोण होते एम विश्वेश्वरय्या, का साजरा केला जातो राष्ट्रीय अभियंता दिन?

National Engineers Day 2023 : भारतरत्न एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून 15 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या हे देशातील महान अभियंत्यांपैकी एक होते. आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

National Engineers Day 2023
राष्ट्रीय अभियंता दिन 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 10:29 AM IST

हैदराबाद : National Engineers Day 2023 देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अभियंत्यांना राष्ट्राचे निर्माते म्हटलं जातं कारण तेच आपल्या दृष्टीला वास्तव देतात. कोणत्याही प्रकल्पात डिझाईन बनवण्यापासून ते त्याच्या बांधकामापर्यंत अभियंत्यांची मोठी भूमिका असते. अशा अभियंत्यांना सन्मानित करण्यासाठी भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख का निवडण्यात आली यामागे एक खास कारण आहे.

अभियंता दिवसाचा इतिहास : भारत सरकारनं सर्वप्रथम 1968 मध्ये अभियंता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. एम विश्वेश्वरय्या यांनी समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यांच्या स्मरणार्थ अभियंता दिन साजरा केला जातो. अभियंता दिन हा अभियंत्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. आपल्या देशाच्या, समाजाच्या आणि जगाच्या विकासासाठी अभियांत्रिकी किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करून, आम्ही अभियंत्यांचे आभार मानतो, त्यांच्यामुळंच आपलं जीवन सोपं झालं आहे.

कोण होते एम विश्वेश्वरय्या : एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. ते फक्त 12 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. अनेक अडचणींतूनही त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. 1883 मध्ये त्यांनी पूण्यातील सायन्स कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतरच त्यांना सहाय्यक अभियंता पदावर सरकारी नोकरी मिळाली. 1912 ते 1918 पर्यंत त्यांनी म्हैसूरचे 19 वे दिवाण म्हणून काम केलं. एमव्हीने म्हैसूर, कर्नाटकला विकसित आणि समृद्ध प्रदेश बनवण्यात मोठं योगदान दिलं आहे. कृष्णराजसागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल ऑइल अँड सोप फॅक्टरी, युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूर, बँक ऑफ म्हैसूर आणि इतर अनेक मोठं यश केवळ एमव्हीच्या प्रयत्नांमुळेच शक्य झालं. या कारणास्तव त्यांना कर्नाटकचा भगीरथ असेही म्हणतात.

म्हैसूरचे मुख्य अभियंता : स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारनं सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यासाठी एमव्ही यांनी पोलादी दरवाजे बनवले जे धरणातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यास उपयुक्त ठरले. त्यावेळी त्यांच्या व्यवस्थेचं ब्रिटीश अधिकार्‍यांनीही खूप कौतुक केलं होतं. आज ही प्रणाली जगभर वापरली जाते. याशिवाय मुसा आणि इसा नावाच्या दोन नद्यांचं पाणी धरणाच्या योजनाही सर एम.व्ही. यांनी तयार केल्या. यानंतर त्यांना म्हैसूरचे मुख्य अभियंता बनवण्यात आले.

भारतरत्नानं सन्मानित : एम विश्वेश्वरयांच्या या योगदानाची दखल घेत स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्यात आला. विश्वेश्वरय्या 100 वर्षांहून अधिक काळ जगले आणि जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत ते कार्यरत राहिले. एकदा एका व्यक्तीनं त्यांना इतकं ताजेतवाणे असण्याचं रहस्य विचारलं, तेव्हा विश्वेश्वरय्याने उत्तर दिलं की जेव्हा जेव्हा म्हातारपण माझ्या दारावर ठोठावतं तेव्हा मी त्यांना सांगतो की विश्वेश्वरय्या घरी नाहीत. यामुळं म्हातारपण निराश होऊन परततं आणि मी त्याला कधीच भेटत नाही.

अभियंता दिनाची थीम : दरवर्षी भारतात राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम सेट केली जाते. यावर्षी 2023 मध्ये, राष्ट्रीय अभियंता दिवस 2023 ची थीम 'शाश्वत भविष्यासाठी अभियांत्रिकी' अशी निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. World physiotherapy Day 2023 : जागतिक फिजिओथेरपी दिवस २०२३; जाणून घ्या काय आहे इतिहास...
  2. World Suicide Prevention Day २०२३ : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2023; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व...
  3. World Lymphoma Awareness Day 2023 : जागतिक लिम्फोमा जागरूकता दिवस 2023; वेळेवर उपचारानं बरा होऊ शकतो लिम्फोमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.