ETV Bharat / bharat

Air India Chairman Appointment : एअर इंडियाच्या चेअरमन पदी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती

टाटा ग्रुपने एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी इलकर आयसी ( Turkeys Ilker Ayci controversy ) यांची आठवडाभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आयसी यांनी ही ऑफर नाकारली. कारण, काही माध्यमांनी त्यांच्या नियुक्तीला वेगळा रंग दिला होता.

चेअरमन नटराजन चंद्रशेखरन
चेअरमन नटराजन चंद्रशेखरन
author img

By

Published : Mar 14, 2022, 10:05 PM IST

नवी दिल्ली - टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन ( Natarajan Chandrasekaran ) यांची एअर इंडियाच्या चेअरमन पदी निवड ( chairman of Air India ) करण्यात आली आहे. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला एअर इंडियाच्या संचालक मंडळाने ( Air India board ) सोमवारी ( 14 मार्च ) मान्यता दिली आहे.

टाटा ग्रुपने एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी इलकर आयसी ( Turkeys Ilker Ayci controversy ) यांची आठवडाभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आयसी यांनी ही ऑफर नाकारली. कारण, काही माध्यमांनी त्यांच्या नियुक्तीला वेगळा रंग दिला होता.

हेही वाचा-Students Reached Mumbai : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल

8 ऑक्टोबरला एअर इंडिया टाटा ग्रुपच्या ताब्यात

मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंत विविध उत्पादने तयार करणाऱ्या टाटा ग्रुपने 8 ऑक्टोबरला एअर इंडिया ताब्यात घेतली आहे. टाटा ग्रुपने एअर इंडिया ही 18 हजार कोटी रुपयांना विकत घेतली आहे. सुत्राच्या माहितीनुसार चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला एअर इंडियाच्या संचालक मंडळाला मंजुरी दिली होती. चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे चेअरमन आहेत. टाटा सन्सही 100 हून टाटा कंपनीची प्रवर्तक कंपनी आहे. चंद्रशेखरन हे ऑक्टोबर 2016 मध्ये सहभागी झाली होती. त्यांची जानेवारी 2017 मध्ये चेअरमन पदी निवड झाली होती.

हेही वाचा-Ilker Ayci as MD of Air India : टाटा सन्सचा मोठा निर्णय; इल्कर आयसी यांची एअर इंडियाच्या चेअरमन पदी निवड

पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या कारकीर्दीत एअर इंडियाचे झाले होते खासगीकरण-

केंद्र सरकारने 69 वर्षानंतर एअर इंडिया ही टाटाकडे सुपूर्द केली आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन जे. आर. डी. टाटा यांनी एअर इंडियाची 1932 मध्ये स्थापना केली होती. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले.

हेही वाचा-Air India Flights for Ukraine : युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याकरिता टाटाची एअर इंडिया सक्रिय, हा घेतला निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.