ETV Bharat / bharat

Rajasthan Election २०२३ : 'रोड शो'दरम्यान मोठा अनर्थ टळला; गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले

Rajasthan Elections 2023 : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील परबतसरात मंगळवारी एक मोठी दुर्घटना टळली. रोड शोदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रथानं विजेच्या तारांना स्पर्श केल्यानं मोठा अपघात टळला. या घटनेमुळं अमित शाह यांचे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit Shah
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 9:10 PM IST

Updated : Nov 7, 2023, 9:53 PM IST

नागौर(राजस्थान) Rajasthan Elections 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रोड शोदरम्यान थोडक्यात बचावले. त्यांचा रथ शोड शोदरम्यान विजेच्या तारेला धडकल्यानं मोठा अपघात टळलाय. गृहमंत्री अमित शाह मंगळवारी दिडवाना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तीन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित केलं.

थोडक्यात बचावले अमित शाह : अमित शाह यांनी प्रचारावेळी 'रोड शो'ही केला. मात्र, परबतसर विधानसभा मतदारसंघातील रोड शोदरम्यान त्यांच्या रथानं विद्युत तारेला स्पर्श केल्यानं रथातून ठिणग्या पडल्या. त्यानंतर तार खांबावरून तुटून खाली पडली. तारेला स्पर्श होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रथ थांबवला. काही वेळातच मागून येणाऱ्या वाहनांचा ताफाही तिथं पोहोचला. यानंतर गृहमंत्री शाह यांना रथातून बाहेर काढून कारमधून सभेच्या ठिकाणी नेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

गेहलोत यांच्यावर निशाणा : गृहमंत्री शाह म्हणाले की, गेहलोत सरकारनं वीरभूमी नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार हे राजस्थानमध्ये आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याची योजना संपूर्ण देशासाठी लागू केली होती. मात्र, गेहलोत सरकारनं 'जल जीवन मिशन'च्या नावाखाली 20 हजार कोटी रुपये फस्त केले. गेहलोत सरकारनं या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप शाह यांनी केलाय. तुम्ही राज्यात भाजपाचे सरकार निवडूण द्या. अडीच वर्षांत आम्ही राजस्थानमधील प्रत्येक घरात नळाचं पाणी पोहचवू, असं आश्वासन शाह यांनी दिलं.

राजस्थान सरकार झोपा काढतं का? : गेहलोत गलिच्छ राजकारण करत आहेत. राज्यात सर्वत्र जातीय दंगली घडल्या आहेत. उदयपूरमध्ये कन्हैयालाल टेलरचा जाहीर शिरच्छेद करण्यात आला, तेव्हा राजस्थान सरकार झोपा काढत होतं का? असा सवाल अमित शाह यांनी केलाय. तुम्ही महावीर जयंती, रामनवमीवर बंदी घातली. दुसरीकडं कोटामध्ये 'पीएफआय'ची रॅली काढण्यात आल्याचा हल्लाबोल त्यांनी गेहलोत सरकारवर केलाय.

हेही वाचा -

  1. ISRO Aditya L1 : इस्रोच्या आदित्य L1 नं जवळून अनुभवल्या सूर्याच्या झळा, शेअर केला पहिला मिशन डाटा
  2. Chhattisgarh Election 2023 : तृतीय पंथीयांसाठी स्पेशल 'रेनबो मतदान केंद्र', निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम
  3. Chhatrapati Shivaji Maharaj Statue : काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपतींचा जयघोष; 'महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी'

Last Updated : Nov 7, 2023, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.