नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असणारे सक्रिय राजकारणी झाले आहेत. सध्या मोदींना ट्विटरवर ६४.७ दशलक्ष फॉलोवर्स आहेत.
इतर पंतप्रधानांच्या तुलनेत मोदी कित्येक पटींनी पुढे..
इतर देशांच्या पंतप्रधानांचे ट्विटर फॉलोवर्स पाहिले असता, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना केवळ ३.२ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेयू यांना ५.४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना तर अगदीच कमी म्हणजे ५.१२ लाख फॉलोवर्स आहेत.
ट्रम्पवरील कारवाईनंतर मोदी पहिल्या स्थानावर..
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असणारे सक्रिय राजकारणी होते. मात्र, आक्षेपार्ह आणि भडकावू ट्विट्स केल्यामुळे ट्विटरने त्यांचे अकाऊंट बंद केले. ट्रम्प यांना ट्विटरवर ८८ दशलक्ष फॉलोवर्स होते. त्यांचे अकाऊंट बंद झाल्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोदींनी पहिल्या स्थानावर उडी घेतली.
हेही वाचा : अफगाणिस्तानः सततच्या संघर्षामुळे एका महिन्यात 18 हजार कुटुंबे विस्थापित