देहरादून - महंत नरेंद्र गिरीच्या मृत्यू प्रकरणातील महत्त्वाची बातमी आहे. महंत नरेंद्र गिरीच्या मृत्यू प्रकरणात आनंद गिरीला ताब्यात घेऊन सीबीआय हरिद्वारला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयची टीम ही श्यामपूरमधील आनंद गिरीच्या आश्रमात तपासणी करत आहे. सीबीआयची टीम सीसीटीव्ही फुटेजसहित आश्रमाची पूर्ण पाहणी करत आहे.
सात दिवस सीबीआयच्या कोठडीत राहिल्यानंतर आनंद गिरीने अनेक महत्त्वाचे खुलासे करण्याची शक्यता आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना हरिद्वारमधून सतत फोन कोण करत होते? हे रहस्य आनंद गिरींना माहित होते का? कोणता प्रॉपर्टी डिलर हा आखाड्याची संपत्ती विकून कोट्याधीश होणार होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सीबीआय ही हरिद्वारला पोहोचली आहे.
संबंधित बातमी वाचा-आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, शिष्यासोबतचा वाद आणि इतिहास; वाचा सविस्तर
आखाड्याच्या मालमत्ता विकून प्रॉपर्टी डीलर व्यावसियाकांची झाली चांदी
एक काळ असा होता की, आखाड्याची केवळ हरिद्वारमध्ये मालमत्ता होती. मात्र, हरिद्वारमध्ये विशाल काँक्रिटचे जंगल तयार झाले आहे. त्यामधील 50 टक्क्यांहून अधिक जमीन ही आखाड्याची आहे. त्यामधील निरंजनी आखाडा हा महत्त्वपूर्ण आहे. आखाड्याकडील मालमत्ता ही हळूहळू कमी झाली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा हा हरिद्वारच्या प्रॉपर्टी डीलर व्यावसायिकांचा झाला होता.
संबंधित बातमी वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरीला हरिद्वारमधून अटक
आनंद गिरीमुळे महंत नरेंद्र गिरी होते त्रस्त
शिष्य आनंद गिरीबरोबर मालमत्तेचा वाद सुरू असल्याने महंत नरेंद्र गिरी त्रस्त होते, असे बोलले जात आहे. नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी हा सतत ब्लॅकमेल करत असल्याच म्हटले होते. ज्या ठिकाणावरून पुरावा मिळू शकेल, अशा ठिकाणी सीबीआय आनंद गिरीला घेऊन जाणार आहेत. तसेच आनंद गिरीचे जाणे-येणे असलेल्या संतांचीही सीबीआय चौकशी करणार आहे.
संबंधित बातमी वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचे वाढले गुढ; आरोपींना कठोर शिक्षा करण्याची आनंद गिरींची मागणी
आनंद गिरीचा हॉटेलसारखा आहे आलिशान आश्रम
आनंद गिरीने हरिद्वारमधील श्यामपूर येथे हॉटेलसारखा आलिशान आश्रम तयार केला आहे. त्यामध्ये प्रापंचिक मनुष्याच्या घरीही सोयी-सुविधा कदाचित नसतील अशा सुविधा आहेत. यापूर्वीच या आश्रमाला प्रशासनाने सील केले आहे. आनंद गिरी हा कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि अन्य मोबाईलचा वापर करत असल्याचा सीबीआयला संशय आहे. हे साहित्य जप्त करून सीबीआय पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे.