ETV Bharat / bharat

Narayana Murthy जावई ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्ति म्हणाले... - जावई ऋषी सुनक

रविवारी 42 वर्षीय ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाची ( Narayana Murthy reaction on Rishi Suna ) आघाडीची शर्यत जिंकली. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचेते भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ( son in law Rishi Sunak ) बनणार आहेत.

नारायण मूर्ति
नारायण मूर्ति
author img

By

Published : Oct 25, 2022, 9:08 AM IST

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे. त्यावर इन्फोसिसचे सहसंस्थापक तथा सुनक यांचे सासरे नारायण मूर्ति यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी 42 वर्षीय ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाची ( Narayana Murthy reaction on Rishi Suna ) आघाडीची शर्यत जिंकली. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचेते भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ( son in law Rishi Sunak ) बनणार आहेत. यावर नारायण मूर्ति म्हणाले, की आम्हाला त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या यशासाठी शुभेच्छा. आम्हाला विश्वास आहे की तो युनायटेड किंगडमच्या लोकांसाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल."

एक फार्मासिस्ट आई आणि डॉक्टर वडिलांचा मुलगा अशी सुनक यांची पार्श्वभूमी आहे. त्यांचे शिक्षण इंग्लंडमधील सर्वात प्रसिद्ध शाळा, विंचेस्टर आणि नंतर ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक. येथे तीन वर्षे घालवली आणि नंतर कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्डमधून एमबीए केले. तिथे त्यांची पत्नी अक्षता मूर्ती, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी भेटली. 2009 मध्ये त्यांनी अक्षतासोबत लग्न केले. या जोडप्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

असा मिळविला विजय सत्ताधारी पुराणमतवादी पक्षाने युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक ( Rishi Sunak ) यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा 42 वर्षीय भारतीय वंशाच्या ( Rishi Sunak Britain Youngest Prime Minister ) ब्रिटिश राजकारण्यासाठी ही दिवाळीची सर्वात मोठी भेटच होती. जेमतेम नऊ आठवड्यांपूर्वी सनक यांचा 20 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सुनक यांना धूळ चारत विजय संपादन केला होता. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 357 खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पक्षाचा नेता होण्यासाठी त्यांना किमान 100 खासदारांचा पाठिंबा हवा होता. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरा यांच्याशी भेट घेतल्यानंतर सुनक पंतप्रधान म्हणून लंडनच्या पंतप्रधान कार्यालय, 10 डाउनिंग स्ट्रीटमध्ये पाऊल ठेवतील. सुनक हे ब्रिटनचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीटचे पहिले हिंदू रहिवासी होण्याचा मान सुनक यांना मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.