हैदराबाद : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा करण्याची परंपरा आहे. नरक चतुर्दशीला रूप चौदस, छोटी दिवाळी, नरक निवारण चतुर्दशी आणि काली चौदस या नावांनी देखील ओळखलं जातं. या दिवशी सकाळी स्नान करून संध्याकाळी यमाच्या नावानं दिवा लावल्यानं अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, असं मानलं जातं. याने उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी चतुर्दशी तिथी 11 आणि 12 नोव्हेंबरला येत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या तारखेबाबत सर्वच जण संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत नरक चतुर्दशीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्तापासून त्याचे महत्त्व.
नरक चतुर्दशी 2023 तारीख : हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01:57 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:44 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी साजरी केली जाईल. यासोबतच जे लोक भगवान यमासह हनुमानाची पूजा करतात ते 11 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी साजरी करतील.
नरक चतुर्दशी २०२३ चे महत्व : एका पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णानं नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सुमारे सोळा हजार मुलींना मुक्त करून त्यांचा सन्मान केला होता. त्याची आठवण म्हणून या दिवशी दिवे लावले जातात. याशिवाय भगवान यमराजाशी संबंधित आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसं होतं. या दिवशी प्रवेशद्वाराव्यतिरिक्त नाल्यासमोर मोहरीच्या तेलाचे दिवे लावले जातात.
अभ्यंग स्नानाची वेळ : नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगावर उटण लावून स्नान केलं जातं. असं मानलं जातं की असं केल्यानं व्यक्ती सर्व रोगांपासून दूर राहते. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी अभ्यंग स्नानाची वेळ 12 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 05:28 ते 06:41 पर्यंत आहे.
हेही वाचा :