ETV Bharat / bharat

रुग्णालयात बेड मिळेना! नंदुरबारच्या रुग्णांनी उपचारासाठी सुरत गाठले

गुजरातलगत असलेल्या महाराष्ट्राच्या नंदुरबार, धुलिया आणि जळगाव येथील कोरोना रुग्णही उपचारासाठी सूरत येथे येत आहेत. या जिल्ह्यांमध्ये उपचारांसाठी बेड व ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने नंदुरबार येथील मनोज संबल या व्यक्तीने आपल्या वडिलांना उपचारासाठी सूरतच्या रुग्णालयात आणले.

नंदुरबार कोरोना अपडेट
नंदुरबार कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 8, 2021, 10:38 PM IST

Updated : Apr 8, 2021, 10:57 PM IST

सुरत - एकीकडे सुरतमध्ये कोरोनाचे सकारात्मक रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे गुजरातलगत असलेल्या महाराष्ट्राच्या नंदुरबार, धुलिया आणि जळगाव येथील कोरोना रुग्णही उपचारासाठी सूरत येथे येत आहेत. या जिल्ह्यांमध्ये उपचारांसाठी बेड व ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने नंदुरबार येथील मनोज संबल या व्यक्तीने आपल्या वडिलांना उपचारासाठी सूरतच्या रुग्णालयात दाखल केले.

नंदुरबारच्या रुग्णांनी उपचारासाठी सुरत गाठले

वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आईचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या आईलाही कोरोनाचा बाधा असल्याचे समोर आले. परंतु पैशाअभावी ते गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयाच्या पायर्‍यांवर राहत आहेत. त्यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

कोरोनाची दुसरी लाट

देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांची संख्या वाढत आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची लक्षणे अत्यंत प्राणघातक असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना विषाणू हा पहिल्यापासून अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात लसींचीही कमतरता आहे, आणि नागरिकांचाही लॉकडाऊनला विरोध आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Last Updated : Apr 8, 2021, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.