ETV Bharat / bharat

Namaz In Rahul Gandhi Rally : राहुल गांधींच्या रॅलीत महिलेने अदा केली नमाज, म्हणाली राहुल गांधी.. - Rahul Gandhi Rally

हरियाणात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पानिपत जिल्ह्यातून सुरू झाला आहे. (Bharat Jodo Yatra in Haryana). या दरम्यान रॅलीच्या ठिकाणी पोहोचलेल्या एका मुस्लिम महिलेने आज राहुल गांधींच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना केली. (namaz in rahul gandhi rally) (rahul gandhi rally in panipat).

Namaz In Rahul Gandhi Rally
राहुल गांधींच्या रॅलीत महिलेने अदा केली नमाज
author img

By

Published : Jan 6, 2023, 5:50 PM IST

महिलेने आज राहुल गांधींच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना केली

पानिपत (हरियाणा) : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून जात आहे. (Bharat Jodo Yatra in Haryana). या रॅली दरम्यान एका महिलेने नमाज अदा केली आहे. (namaz in rahul gandhi rally). या महिलेने राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. (rahul gandhi rally in panipat).

Namaz In Rahul Gandhi Rally
राहुल गांधींच्या रॅलीत महिलेने अदा केली नमाज

सोनिया गांधींना भेटायला दिल्लीत परतले : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पानिपत जिल्ह्यातून सुरू झाला आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातून हरियाणातील पानिपतमध्ये दाखल झाली आहे. राहुल गांधींचा हा प्रवास नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू झाला. या यात्रेची सुरुवातीची वेळ सकाळी 6 वाजता होती, मात्र ही यात्रा सकाळी 8 नंतर सुरू होऊ शकली. राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने ते उत्तर प्रदेशातून थेट दिल्लीला गेले होते. त्यांना तेथून परतायला थोडा वेळ लागला, त्यामुळे या प्रवासाला दोन तास उशीर झाला. पानिपतच्या संजय चौकात आल्यानंतर राहुल गांधी रॅलीच्या ठिकाणापर्यंत कारमध्ये गेले. त्यांच्या रॅलीपूर्वी या महिलेने तेथे नमाज अदा केली.

यात्रा हरियाणातून पंजाबला रवाना होईल : नमाज अदा करणाऱ्या अमरेश खातूनने सांगितले की, आम्ही मजूर आहोत. आम्हाला मदतीची गरज आहे. त्यांनी (राहुल गांधी) आमचे सर्व प्रश्न सोडवले पाहिजे. या रॅलीसाठीच मी इथे आली आहे. राहुल गांधींच्या या यात्रेला यश मिळू दे. आज जुम्मा आहे, त्यामुळे सर्वांचे आशीर्वाद ऐकले जातील. राज्य सीआयडीच्या डीएसपी सूत्राकडून माहिती मिळाली आहे की आजही राहुल गांधी पानिपतला थांबणार नाहीत. दिल्लीहून चालकाला बोलावण्यात आले आहे. रॅलीनंतर राहुल गांधी हवाईमार्गाने दिल्लीला जातील. पानिपतनंतर राहुल कर्नाल, कुरुक्षेत्र आणि अंबालाच्या शंभू सीमेवरून पंजाबला रवाना होतील.

bharat jodo yatra in Haryana
भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून जात आहे

यात्रा कधी कुठे पोहचणार? - काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेचे वेळापत्रक शेअर केले आहे. भारत जोडो यात्रा 6 जानेवारीला हरियाणात दाखल झाली. तेथे ती 10 जानेवारीपर्यंत राहील. या नंतर ही यात्रा 11 जानेवारीला पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि 19 जानेवारीला हिमाचल प्रदेशातून एक दिवसासाठी जाईल. वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, 20 जानेवारीला ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 30 जानेवारीला राहुल गांधी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील आणि या यात्रेची सांगता होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.