ETV Bharat / bharat

Fire Broke Out : इटानगरच्या दैनंदिन बाजारात भीषण आग, 700 दुकाने जळून खाक

अरुणाचल प्रदेशातील Arunachal Pradesh इटानगर येथील नाहरलागुन डेली मार्केटमध्ये आग लागली. 700 दुकाने जळून खाक झाली आहेत.

Massive Fire Broke Out In Itanagars
इटानगरच्या दैनंदिन बाजारात भीषण आग
author img

By

Published : Oct 25, 2022, 4:22 PM IST

अरुणाचल प्रदेश : इटानगर येथील नाहरलागुन डेली मार्केटमध्ये आग लागली. 700 दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन तासात केवळ दोनच दुकानांना आग लागली होती, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला अपयश आले, त्यामुळे आग इतर दुकानांमध्ये पसरली आहे.

Massive Fire Broke Out
इटानगरच्या दैनंदिन बाजारात भीषण आग

फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरजवळील नाहरलगुन दैनिक बाजार येथे मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत किमान 700 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की हे राज्यातील सर्वात जुने बाजार आहे आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून सुमारे 14 किमी अंतरावर नाहरलागुन येथील अग्निशमन केंद्राजवळ आहे. दिवाळी साजरी करताना पेटवलेल्या फटाक्यांमुळे किंवा दिव्यातून ही आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Arunachal Pradesh | A massive fire broke out in Itanagar's Naharlagun due to unknown reasons. Over 700 shops were burnt to ashes; however, no casualties reported yet. pic.twitter.com/g57RhloWGl

    — ANI (@ANI) October 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आगीने केले भीषण रूप धारण : अग्निशमन विभागाने तत्काळ कारवाई केली मात्र दुकाने बांबू व लाकडाची असून सुक्या मालाने भरलेली असल्याने आग झपाट्याने पसरली असा दावा त्यांनी केला. घाबरलेल्या दुकानदारांनी आगीपासून काय वाचवता येईल याचा प्रयत्न केला, मात्र बिगर सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन यंत्रे वापरण्यात आली, त्यापैकी एक इटानगर येथून आणण्यात आली आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

दुकानदारांनी केला आरोप : आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात असला तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाच्या तपासानंतरच आगीचे कारण समजेल, असे पोलिस अधीक्षक (राजधानी) जिमी चिराम यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच ते जवळच्या अग्निशमन केंद्रात पोहोचले, मात्र तेथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हते, असा आरोप दुकानदारांनी केला. अग्निशमन दलाचे जवान आले तेव्हा विझवण्याच्या यंत्रात पाणी नव्हते, असा दावा त्यांनी केला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाणी भरण्यासाठी दूरवर जावे लागले आणि ते पहाटे ५ वाजताच माघारी परतले, तोपर्यंत मार्केटचा बहुतांश भाग आगीत होरपळून निघाला होता, असा आरोप दुकानदारांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.