ETV Bharat / bharat

नागपूर खंडपीठाच्या पोक्सो कायद्याच्या निकालाविरोधात महिला आयोग पक्षकार - राष्ट्रीय महिला आयोग

बाल लैंगिक अत्याचाराच्या खटल्यात नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालावरील वादंग अद्यापही मिटले नाही. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आज (बुधवार) सुनावणी झाली.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 10, 2021, 2:03 PM IST

नागपूर - बाल लैंगिक अत्याचाराच्या खटल्यात नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालावरील वादंग अद्यापही मिटले नाही. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आज (बुधवार) सुनावणी झाली. त्वचेचा त्वचेशी प्रत्यक्ष संबंध आला नाही तर लैंगिक अत्याचार ठरणार नाही. हे कृत्य पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार ठरत नाही, असा निकाल नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती दिली होती.

वादग्रस्त निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती -

12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला होता. या निकालावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारतीय स्त्री शक्ती संस्थेने सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. मात्र, राष्ट्रीय महिला आयोग या प्रकरणात हस्तक्षेप करून याचिका करू शकते, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले. भारतीय स्त्री शक्ती संस्था आपल्या मागण्या राज्यात मांडू शकते, असे बोबडे यांनी म्हटले.

भारताचे अॅटर्नी जनलर के. के वेणूगोपाल सुनावणीवेळी उपस्थित होते. 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी नागपूर खंडपीठाला नोटीस जारी करण्यात आली असून आरोपी तुरुंगातच आहे, असे वेणूगोपाल यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 39 वर्षीय व्यक्तीवर 12 वर्षीय मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आरोपीला शिक्षाही सुनावण्यात आली होती. पण, याबाबत आरोपीच्या वकीलाने नागपूर खंडपीठात निकालाला आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी निरीक्षण नोंदवले. त्यांनी नोंदवलेल्या टिप्पणीनुसार कपड्यावरून केलेला स्पर्श लैंगिक अत्याचार ठरणार नाही. हा फक्त विनयभंग ठरेल, असा निकाल दिला होता.

पॉक्सोच्या कलम 8 अंतर्गत हा लैंगिक अत्याचार ठरणार नाही. पण, यानुसार भा.दं.वि.च्या 354 अंतर्गत विनयभंग ठरू शकतो. असे असल्यास त्या प्रकरणात 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकेल, असेही न्यायाधीशांनी सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.