चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष आता कसून तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे तामिळनाडूमध्ये पोंगल साजरा करणार आहेत.
१४ तारखेला होणाऱ्या पोंगल उत्सवासाठी तामिळनाडू भाजपाने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित राहतील. पोंगलनिमित्त भाजपाने विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीचाही समावेश असणार आहे.
तर दुसरीकडे राहुल गांधी हे तामिळनाडूचा पारंपारिक खेळ 'जल्लीकट्टू'मध्ये सहभागी होणार आहेत. मदुराईच्या अवनीयापूरममध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तामिळनाडू काँग्रेस कमिटीने याबाबत माहिती दिली. राहुल गांधींच्या तामिळनाडू भेटीची टॅगलाईन 'राहुलिन तामिळ वनक्कम' अशी असणार आहे.
दरम्यान, द्रमुकनेही या निवडणुकांसाठी कंबर कसली असून, मंगळवारी पक्षाने आपली प्रचाराची रणनीती जाहीर केली आहे. चार टप्प्यांमध्ये द्रमुक प्रचार करणार असून, येत्या पोंगलपासून हा प्रचार सुरू होणार आहे.
हेही वाचा : अतिप्रसंग करु पाहणाऱ्याची तरुणीकडून हत्या; पोलिसांनी केले निर्दोष मुक्त