म्हैसूर कर्नाटक कर्नाटकातील एका प्रतिष्ठित मठाच्या स्वामीजींवर त्यांच्या शिष्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी शुक्रवारी म्हैसूरच्या ओडनदी सेवा ट्रस्ट ऑफ वुमेन्स फॅसिलिटेशन अँड चिल्ड्रन्स हाऊसिंग सेंटरमध्ये स्वामीजींच्या विरोधात तक्रार दाखल Students accused Swamiji of sexually harassment केली. 'ओडनदी' या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी शिष्यांचे समुपदेशन केले. यानंतर त्यांना म्हैसूर येथील बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनी मठ संचलित कन्या आश्रमात शिकतात आणि मठाच्याच मोफत वसतिगृहात त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. शिष्यांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून एकदा स्वामीजी त्यांना आशीर्वादाच्या नावाने खोलीत एकटे बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करायचे. लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवल्याने वसतिगृहातील वॉर्डन आणि इतर कर्मचारी त्यांना मारहाण करायचे. एवढेच नाही तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शिष्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले.
वसतिगृहातून हाकलून दिल्यानंतर शिष्यांनी आपल्या घरी परतण्याऐवजी बंगळुरू येथील नातेवाइकांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूमधील एका ऑटो चालकाला स्वामीजींच्या वर्तनाबाबत सांगितल्यावर ऑटोचालकाने त्यांना कॉटन पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी शिष्यांना त्यांच्या पालकांकडे पाठवले. येथे शिष्यांच्या पालकांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली.
ओडनदी सेवा संस्थानचे संचालक स्टॅलिन यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, ही संवेदनशील आणि एका मठातील स्वामींशी संबंधित प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण माहिती देणे शक्य नाही. तथापि, त्यांनी सांगितले की हे प्रकरण पॉक्सो कायद्यांतर्गत येते, म्हणून मुलींचे प्रथम समुपदेशन केले गेले आणि बाल कल्याण समितीसमोर हजर केले गेले. ओडनदी सेवा संस्थेचे आणखी एक संचालक परशुराम यांनी सांगितले की, म्हैसूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक चेतन यांना स्वामीजींवर शिष्यांनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची माहिती दिली आहे. या प्रकरणाबाबत, जिल्हा बाल संरक्षण युनिटचे विधी आणि निरीक्षण अधिकारी चंद्रकुमार यांनी पाच जणांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. Students accused Swamiji of Karnataka Prestigious matha of sexually harassment