म्हैसूर - कर्नाटकाच्या म्हैसूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून ती आपल्या घरी मुंबईला परतली आहे. तेथूनच ती पोलिसांना चौकशीसाठी मदत करणार आहे. पोलिसांनी तामिळनाडूमधून पाच संशयितांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तीला आणि तिच्या मित्राला संशयितांची फोटो व्हॉटसअॅपवरून पाठवली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा गट नियमितपणे म्हैसुरूला येत आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांना लुटायचे आणि शहरात चोरी करत. यानंतर ते सत्यमंगलम परत जायचे. चोरी केल्यानंतर परत जात असताना ते ललिताद्रिनगर (उत्तर) परिसरातील टेकडीवर पार्टी करत असत. यावेळी ते परत जात असताना त्यांच्या नजरेस पीडिता आणि तिचा मित्र पडले. यावेळी त्यांना दोघांना धमकावत पैशांची मागणी केली आणि तीच्यावर बलात्कार केला.
शहरातील तीन ठिकाणीदेखील त्यांनी चोरी केली असल्याची माहिती आहे. या चोरांचा इतर अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसांनी संशंय आहे. संशयिताना तामिळनाडूमधून म्हैसूर येथे आणण्यात आले आहे. तसेच त्यांची अज्ञात ठिकाणी पोलिसांनी चौकशीदेखील केली असल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांकडून कोणतेही अधिकृत पत्रक जारी करण्यात आले नाही. याप्रकरणी पोलीस विभागाकडून सांयकाळी पत्रकार परिषद घेण्यात येईल, अशी शक्यता आहे.
काय प्रकरण?
कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर म्हैसूर आहे. म्हैसूर शहरापासून 13 कि.मी दूर असलेल्या चामुंडी टेकडीवर पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. दोघजण एकातांत बसले होते. यावेळी आरोपींनी त्या दोघांचे मोबाईलवर खासगी क्षण चित्रित केले.आरोपी दोघांजवळ गेले आणि त्यांना व्हिडिओ दाखवत धमकावले. पीडिताकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाने ते दोघेही घाबरले होते. आपल्या जीवासाठी त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र, 2 वाजेपर्यंत पैशांची जुळवाजुळव पीडित करू शकले नाही. यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी तरुणाला दगडाने मारले. दोघांना मरणाअवस्थेत सोडून पीडितेचा मोबाईल घेत आरोपींनी पळ काढला.
हेही वाचा - गोव्यात सात महिन्यांत महिला अत्याचारांच्या दीडशे घटना, सर्वाधिक घटना बलात्काराच्या
हेही वाचा - #JeeneDo : क्रौर्याची परिसीमा अन् हादरून टाकणाऱ्या देशातील बलात्काराच्या आजवरच्या घटना
हेही वाचा - #JeendeDo महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया