ETV Bharat / bharat

Muzaffarnagar Crime News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या; मृतदेह खड्ड्यात जाळला - दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली येथे रविवारी सकाळी दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह खड्ड्यात जळलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. अवैध संबंधातून तरुणाची हत्या करून; मृतदेह जाळण्यात आल्याची चर्चा गावात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Muzaffarnagar Crime News
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या
author img

By

Published : Mar 12, 2023, 7:00 PM IST

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली येथे रविवारी सकाळी शेणाच्या गोवऱ्यांंच्या आणि कुटाराच्या ढीगाऱ्यात जळत असलेल्या तरुणाचा मृतदेह पाहून गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली आणि अर्धा जळालेला मृतदेह बाहेर काढला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला मृतदेह गावातील तरुणाचा असल्याची ओळख पटली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Muzaffarnagar Crime News
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या

अवैध संबंधातून तरुणाचा खून : अवैध संबंधातून तरुणाचा खून करण्यात आला असून; त्यानंतर मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि प्रकरणाच्या तपासानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या तहरीरच्या आधारे तपास सुरू आहे.

कुटुंबीयांनी गोंधळ सुरू केला : खतौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहपूर गावात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या, तितरवाडा येथील रहिवासी कुलदीप चौहान उर्फ ​​दीपक यांचा मुलगा सुभाष याचा जळत असलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी बितोरे येथे सापडला, जे पाहून ग्रामस्थ हादरले. या घटनेची माहिती नातेवाईकांसह ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह आगीतुन बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मात्र, दरम्यान, गावकरी आणि कुटुंबीयांनी गोंधळ सुरू केला. पोलिसांनी आरोपींवर कारवाईचे आश्वासन देऊन ग्रामस्थांना कसेबसे शांत केले.

तपासानंतरच मृत्यूचे कारण समजेल : दोन दिवसांपूर्वी हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता, त्याची माहिती त्याच्या आईने १० मार्च रोजी खतौली पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपींनी खून करून मृतदेह जाळल्याचा संशय आहे. त्याचबरोबर अवैध संबंधांमुळे कुलदीपचा खून झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, पोलीस या घटनेच्या तपासात गुंतले असल्याचे सीओ डॉ. रविशंकर त्रिपाठी यांचे म्हणणे आहे. हा तरुण त्याच्या मामाच्या घरी राहत होता. तपासानंतरच मृत्यूचे कारण समजेल.

हेही वाचा : Budgam Young Girl Killed : श्रध्दा वालकर हत्याकांडाची जम्मू काश्मीरमध्ये पुनरावृत्ती, तरुणीचे शरीराचे तुकडे करून फेकले!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.