ETV Bharat / bharat

कौतुकास्पद! पहिल्या श्रावण सोमवारी मुस्लिम महिलेने केली भोलेनाथांची महापूजा; मंदिर-मशीद यांच्या नावावर भांडणाऱ्यांसाठी दिला धडा - भगवान भीमसेन

मुस्लिम महिलेने मंदिरात पूजा करून समाजातील लोकांना संदेश दिला. मंदिरात मुस्लिम महिलेला पाहून लोकांना आश्चर्य वाटले. हिंदू-मुस्लिम आणि मंदिर-मशीद यांच्या नावावर भांडणाऱ्यांसाठी हा धडा आहे. ( muslim woman worshiped god in mainpuri )

muslim woman worshiped god in mainpuri
भोलेनाथांची महापूजा
author img

By

Published : Jul 18, 2022, 4:50 PM IST

मैनपुरी : उत्तर भारतात सध्या श्रावण महिना सुरू आहे. आज 18 जुलै रोजी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. मैनपुरी येथील प्राचीन भीमसेन महाराज मंदिराची सजावट करण्यात आली आहे. शिवालयात शिवभक्तांची गर्दी केली आहे. श्रावण महिन्यात मंदिराचे महत्त्व अधिकच वाढते. मंदिरात भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहेत. त्यामुळे शिवभक्तांची मंदिरात वर्दळ सुरु आहे. त्यात रविवारी (17 जुलै) बुरखा घातलेली एक मुस्लिम महिला मंदिरात आली होती. यावेळी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात होते. त्यांनी भगवान भोलेनाथाची पूजा केली आणि नवस मागितला, असे येथील पुजाऱ्यांनी सांगिलते.

मुस्लिम महिलेने केली भोलेनाथांची महापूजा

मंदिर-मशीद यांच्या नावावर भांडणाऱ्यांसाठी दिला धडा - या मुस्लिम महिलेने मंदिरात पूजा करून समाजातील लोकांना संदेश दिला. मंदिरात मुस्लिम महिलेला पाहून लोकांना आश्चर्य वाटले. हिंदू-मुस्लिम आणि मंदिर-मशीद यांच्या नावावर भांडणाऱ्यांसाठी हा धडा आहे.

पौराणिक भगवान भीमसेनचे मंदिर - मोहल्ला गाडीवान येथे असलेले भीमसेन महाराजांचे आधुनिक मंदिर बाराव्या शतकात स्वरूपात बांधण्यात आले अशी आख्यायिका आहे. पण, भगवान भीमसेनची देवता पौराणिक काळातील असल्याचे म्हटले जाते. शहराच्या ईशान्येला शीतला देवीचे मंदिर असताना भगवान भीमसेन अग्निमय कोनात विराजमान आहेत. शिवाला उत्तर दक्षिण या पवित्र नगरीचे रक्षण करण्यासाठी शिवाला उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्यामध्ये बसवले आहे, अशी या मंदिराची धारणा आहे. बटेश्वर धामाप्रमाणे येथेही शिवाची मूर्ती पद्मासन मुद्रेत विराजमान आहे. देवतेमध्ये मस्तकावर मोठ्या पाटाने सजलेली चंद्रकला धारण केलेल्या आणि मोठ्या मिशांनी सजवलेल्या भगवान भोलेनाथांना शोभा आली आहे.

मंदिराची अशी आहे आख्यायिका - भीमसेन महाराज मंदिराविषयी असे म्हटले जाते की पांडव त्यांच्या वनवासात इच्छू नदीच्या (सध्याचे इशान) किनारी बिथूरला जाताना येथे थांबले होते. पांडवांनी भीमसेन मंदिरात मुक्काम करून भीमसेन महाराजांची पूजा केली. या मंदिरात सर्व धर्माचे लोक पूजा करण्यासाठी येतात.

हेही वाचा - Video : फुटबॉलपटूला लाजवेल असा गायीचा फुटबॉल खेळ; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल... वाह!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.