ETV Bharat / bharat

आसाम : लखीमपूर जिल्ह्यात लुडो खेळताना वाद, तरुणाची निर्घृण हत्या - fight on ludo lakhimpur assam

लुडो खेळताना वाद झाला. त्यानंतर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात एका तरुणाला ( Murder of youth in Lakhimpur ) आपला जीव गमवावा लागला. ही घटना रविवारी रात्री लखीमपूर जिल्ह्यात घडली. इशाद अली, असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 17, 2022, 12:29 PM IST

लखीमपूर (आसाम) - लुडो खेळताना वाद झाला. त्यानंतर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात एका तरुणाला ( Murder of youth in Lakhimpur ) आपला जीव गमवावा लागला. ही घटना रविवारी रात्री लखीमपूर जिल्ह्यात घडली. इशाद अली, असे मृत तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - चीन, पाकिस्तानला भरणार धडकी.. भारतीय नौदलात दाखल होणार दोन शक्तिशाली लढाऊ जहाजे..

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मैदामिया येथील रहिवासी अयुब अली यांच्या मुलाचे रविवारी लग्न होते. यावेळी एक तरुणांचा गट लग्नाच्या ठिकाणी भेटला आणि लुडो खेळू लागला. यावेळी खेळाच्या दरम्यान दोन युवक अफझात अली आणि इशाद अली दोन्ही एकाच गवात राहणारे यांच्यात धक्काबुक्की झाली.

भांडणाच्या वेळी इशादचे वडील वाजिद अली लग्नाच्या ठिकाणी पोहचले. यावेळी त्यांना आणि इरशादला अफझतने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर याप्रकरणी वाजिदने लखीमपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर रात्री अफझत रात्री 9 वाजता लग्नाच्या ठिकाणी आला, तो चाकू घेऊन आला आणि त्याने आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी इशाद अलीवर प्राणघातक वार केले. यात इशादचा जागीच मृत्यू झाला, असे पोलीस म्हणाले. ही घटना घडल्यापासून आरोपी फरार आहे.

हेही वाचा - LIC Share Listing : एलआयसीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचिबद्ध.. पहिल्याच दिवशी मिळाली 'इतकी' किंमत..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.