ETV Bharat / bharat

मुनव्वर रानांकडून तालिबानचे समर्थन, म्हणाले भारतात रामराज नाही, कामराज! - तालिबान समर्थन

मुनव्वर राना यांनी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना महर्षी वाल्मीकी यांच्याशी केली. वाल्मिकी हे सुरुवातीला कोण होते? त्यानंतर काय झाले? तालिबानीही पूर्वीपेक्षा बदलले आहेत. आता, पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही.

मुनव्वर राना
मुनव्वर राना
author img

By

Published : Aug 19, 2021, 7:42 PM IST

Updated : Aug 19, 2021, 8:36 PM IST

लखनौ/काबुल - उत्तर प्रदेशमध्ये तालिबानींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. समाजवादी पक्षाचे खासदार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री मौसाना मसूद मदनी यांच्यानंतर प्रसिद्ध शायर मुनव्वर राना यांनी तालिबानींना समर्थन (Munawwar Rana Support Taliban) दिले आहे. तालिबानी लोक वाईट नाहीत. परिस्थितीमुळे ते तसे झाल्याचे राना यांनी अजब वक्तव्य केले आहे.

अफगाणिस्तानमधील स्थितीवर मुनव्वर राना यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की तालिबानींबरोबर 20 वर्षे अन्याय झाला. जर बी असे पेरले तर देवता कशी निर्माण होणार? अशा बीमधून मखमल निघणार नाही. अफगाणिस्तान नेहमीच भारताचा मित्र देश राहिलेला आहे. अफगाणिस्तानच्या लोकांना हिंदुस्थानचे खास आकर्षण आहे. त्यामुळे ते येथे येणे पसंत करतात.

हेही वाचा-नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आदर करणाऱ्या अफगाण सरकारला युरोपियन संघ सहकार्य करेल

अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे भारताचे नुकसान नाही, तर फायदा होईल

अफगाणिस्तानात महिलांवरील अन्यायाबाबतही मुनव्वर यांनी तालिबानची बाजू सावरून घेतली. मुनव्वर म्हणाले, की सौदरी अरेबियामध्येही अशीच स्थिती आहे. यावर सर्वांनी बोलले पाहिजे. तालिबानी हे वेडे नाहीत. जर भारताने अफगाणिस्तानमध्ये विकास केला तर ते नाश करणार नाहीत. अफगाणिस्तानवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. हे लोक धोका देणारे नाहीत. अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे भारताचे नुकसान नाही, तर फायदा होईल असाही राना यांनी दावा केला.

हेही वाचा-Viral Video : अफगाणिस्तानातून निघण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर पुन्हा गर्दी

महर्षी वाल्मीकी यांच्याशी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना

भारताने अफगाणिस्तान नाही तर पाकिस्तानला घाबरण्याची गरज आहे. तालिबानींना काश्मीरशी काहीही देणे-घेणे नाही. राना यांनी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना महर्षी वाल्मीकी यांच्याशी केली. वाल्मिकी हे सुरुवातीला कोण होते? त्यानंतर काय झाले? तालिबानीही पूर्वीपेक्षा बदलले आहेत. आता, पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही.

हेही वाचा-फायझरसह अॅस्ट्राजेनेकाची लस अल्फाच्या तुलनेत डेल्टा विषाणूवर कमी प्रभावी - संशोधन

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्त्यानेही तालिबानला दिले समर्थन-

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारतामधून विविध लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. समाजवादी पक्षाच्या खासदारानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानला बुधवारी जाहीरपणे समर्थन दिले आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (AIMPLB) प्रवक्ता मौलाना प्रवक्ता सज्जाद नोमानी म्हणाले, की ''मी तालिबानला सलाम करतो. तालिबानने संपूर्ण जगात ताकदवान असलेल्या सैन्याला पराभूत केले. या तरुणांनी (तालिबानी दहशतवादी) अफगाणिस्तानच्या काबुलच्या जमिनीला स्पर्श केला आणि ईश्वराचे आभार मानले आहेत.'' पुढे लॉ बोर्डाचे प्रवक्ता म्हणाले, की ''हत्यारे नसलेल्या समुदायाने जगातील सर्वात ताकदवान सैन्याला पराभूत केले आहे. ते (तालिबानी) काबुलमधील महालात दाखल झाले आहेत. महालात दाखल होण्याची त्यांची पद्धत सर्व जगाने पाहिली आहे. त्यांच्यामध्ये कोणताही गर्व आणि राग नव्हता. त्यांनी मोठ्या गोष्टी बोलून दाखविल्या नाहीत. अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदुस्थानी मुसलमान आपल्यालाला सलाम करत आहे. तुमच्या इच्छाशक्तीला सलाम करत आहे. तुमच्या उत्साहाला सलाम करत आहे.

हेही वाचा-दिशाहीन तालिबान सैरभैर! सरकार चालविण्यासाठी माजी अधिकाऱ्यांसमोर तालिबानचे आर्जव!''

Last Updated : Aug 19, 2021, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.